
प्रतिनिधी(महेश्वर तेटांबे)-देवसेवा प्रतिष्ठान बदलापूर संस्थेच्या वतीने रविवार दि. ८/११/२०२० रोजी देवसेवा नगरी, वाऱ्याचीवाडी, चरगाव, बदलापूर येथे संस्थेचे पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष श्री. देविदास सोनवणे, उपाध्यक्षा सौ. दिपाली सोनवणे, कार्याध्यक्ष श्री.नितिन बोराडे, उपकार्याध्यक्ष श्री.अरुण भोईर, व्यवस्थापक श्री.सिद्धार्थ खंडागळे, सल्लागार श्री.शहाजी जाधव व उपखजिनदार आश्लेषा सोनवणे, हर्ष सोनवणे, यांच्या उपस्थितीत गावातील गरीब, गरजू आदिवासी समाजातील प्रत्येक विद्यार्थास स्कुलबॅग व पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करून शिक्षणा विषयी महत्व पटवून देण्यात आले. तसेच आदिवासी समाजातील लोकांना छोटया मोठ्या सामाजिक कार्यासाठी गावातील मंदिर परिसरात एक पत्राशेड उभारून गावातील सर्वच लोकांसाठी गावभोजन कार्यक्रम राबविण्यात आला. त्याचप्रमाणे
देवसेवा नगरी येथील देवसेवा आश्रम मध्ये अनाथाश्रम, महिलाश्रम, वृद्धाश्रम व कलाश्रम असे चार आश्रम एकत्रित करण्यामाघील संस्थेचा मुख्य उद्देश व गावातील आदिवासी लोकांना त्यापासून मिळणारे फायदे व रोजगार उपलब्धता याचे महत्व संस्थापक अध्यक्ष देविदास सोनवणे यांच्या कडून सांगण्यात आले व देवसेवा नगरीच्या कार्यात सुरवाती पासून यांच्या सोबत असणारे सहकारी श्री.नितीन बोराडे व श्री.सिद्धार्थ खंडागळे यांना देवसेवा नगरीचे डायरेक्टर पदी घोषित करण्यात आले, तसेच श्री.अरुण भोईर यांचेही या कार्यासाठी मोठे सहकार्य लाभल्याने त्यांना शाल व श्रीफळ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बदलापूर येथील डॉक्टर शिंदे साहेब व गावातील काही प्रतिष्ठित वेक्ती तसेच देवसेवा नगरीतील इतर काही कॉन्ट्रॅक्टर, कामगारवर्ग, प्लॉटधारक, जागेचे मूळमालक व संस्थेचे पदाधिकारी तसेच गावातील साधारण २०० महिला पुरुष, वृद्ध व विद्यार्थीवर्ग या कार्यक्रमास उपस्थित राहिल्याने यासर्वांचे संस्थेचे अध्यक्ष श्री.देविदास सोनवणे यांनी आभार वेक्त केले