
नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे. सत्तेत आलेल्या काँग्रेसने जिल्हा परिषद निवडणकीमध्ये जोरदार मुसंडी मारली आहे.
नितीन गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीसांना मोठा धक्का बसला आहे.
नागपूर जिल्हा परिषद एकूण जागा- 58
काँग्रेस-26
राष्ट्रवादी – 12
भाजप -10
शिवसेना -01
अपक्ष– 01
शेकाप- 01