देशाचे नेते राहुल गांधी व काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या विरोधात भाजपचे नेते सुब्रमण्यम स्वामी व इतर नेते मंडळी जाणून बुजून षडयंत्र रचून ईडीची चौकशी लावली आहे.
देशाचे पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी सन १९३८ मध्ये ‘नॅशनल हेरॉल्ड’ हे वृत्तपत्र सुरू केले. ते सन २००८ मध्ये बंद पडले. त्यानंतर सन २०१० मध्ये ‘यंग इंडिया’ या नव्याने स्थापन झालेल्या कंपनीने हे वृत्तपत्र विकत घेतले. या व्यवहारासाठी काँग्रेसने तब्बल ९० कोटी रुपये कर्जाऊ दिले होते.

काँग्रेसकडून कर्ज घेऊन हे वृत्तपत्र ताब्यात घेण्याचा व्यवहार हा या वृत्तपत्राच्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी करण्यात आला असून तो बेकायदेशीर आहे; असा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.यांनी केलेले आरोप हे दिवाणी स्वरूपाचे आहेत या प्रकरणात कोणाचीही फसवणूक झालेली दिसून येत नाही.दिवाणी स्वरूपाची तक्रार असताना सदर प्रकरणात मोठा घोटाळा झाला आहे असे भाजपचे नेते दाखविण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्या देशात सत्तेत असलेले भाजप सरकार काँग्रेस पक्षाला बदनाम करण्यासाठी जाणून बुजून षडयंत्र रचून ईडी ची चौकशी व सीबीआय चौकशी लावून त्रास देण्याचा प्रकार सुरु केला आहे.भाजपचे नेते घोटाळे केले तर कुठल्याही प्रकारची चौकशी होत नाही व भाजप विरोधी पक्षाच्या नेत्याच्या मागे ईडी व सीबीआय लावून बदनाम केले जाते असे वातावरण निर्माण झाले आहे.देशाचे नेते राहुल गांधी व सोनिया गांधी यांच्या मागे ईडी ची चौकशी लावून दररोज ईडीच्या कार्यालयात बोलवून त्रास देणे हे योग्य नाही. या घटनेचा बहुजन महापार्टी तर्फे जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत असून देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद पंतप्रधान नरेंद्र मोदी व महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना याबाबत कळविण्यात आले असून सदरचा प्रकार तात्काळ बंद करावा व दिवाणी स्वरूपाच्या तक्रारीत ईडी काय चौकशी करणार ? सुब्रमण्यम स्वामी यांनी दिलेली तक्रार दिवाणी स्वरूपाची असल्याने सदर प्रकरणात ईडीची चौकशी तात्काळ बंद करावी अन्यथा बहुजन महापार्टी तर्फे अनेक राज्यात कायदेशीर मार्गाने धरणे व आंदोलने करण्यात येईल याची नोंद केंद्र सरकारने घ्यावी असे बहुजन महापार्टी तर्फे केंद्र सरकारला कळविण्यात आले आहे असे बहुजन महापार्टीचे महासचिव शमसूद्दीन खान यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *