आम्ही भारताचे नागरिक भारतीय संविधानाचा प्रचंड आदर करतो. भारतीय संविधानाचा अनादर करून देशात धर्माच्या नावाखाली जो हुडगुस घातला जात आहे त्याचा आम्ही निषे ध करतो.
देशातील युवक देशाचे भविष्य आहे. देशातील युवकांचे भविष्य घडविण्यात देशातील विद्यापीठाचे मोठे योगदान आहे.
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठ जे आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजले आहे. त्या विद्यापीठात गुंड प्रवृत्तीच्या ज हाल संघटनानी विद्यार्थांना बेदम मारहाण केली. जमिया इस्लामिक विद्यापीठ, जाधव पूर विद्यापीठ आदी विद्यापीठात गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हैदोस घातला आहे. त्यास केंद्रातील सरकार चे समर्थन असल्याचे आमचा आरोप आहे.
या सर्व घटनेचा निषेध करण्यासाठी *सर्वधर्मीय संविधान बचाव समिती* तर्फे *शनिवार दिनाक १८ जानेवारी २०२० रोजी सायंकाळी ५ ते ७ दरम्यान नवघर राज्य परिवहन महामंडळाच्या डेपो समोर*
आंदोलन करण्यात आले.
याआंदोलनात मौलाना सुबहान, समीर वर्तक, फादर मायकल जी, शशी सोनवणे, फारूक मुल्ला, दत्तात्रेय धुळे, अशोक पांडे, झुराण लोपीस, डॉ नासिर शेख, adv खालिद, प्रकाश कांबळे, डॉ सुरेश गोतपागर, शमीम खान, कल्लन खान, व्हेलेरियन घोन्सलविस, विक्रांत चौधरी, मेकॅन्झी डाबरे, सुनील डाबरे, एव्हरेस्ट डाबरे, जोएल डाबरे, संजय डाबरे,डायगो लोपीस, मोईद्दीन भाई, किरण शिंदे, सलीम खिमाणि, शम्स पठाण, तसेच अनेक महिला कार्यकर्त्या व वसईतील अनेक मान्यवर आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *