
◆ धडक कामगार युनियनच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संपाला सुरवात!
पालघर : धडक कामगार युनियनच्या अर्नाळा मच्छिमार विविध कार्यकारी संस्था मर्या. युनिट च्या कामगारांनी धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली संप आज सुरू केला असून सर्व कामगारांनी त्याला पाठिंबा दिला आहे. कामगारांनी आपल्या हक्कांसाठी दाखवलेल्या एकजुटीबद्दल कामगारांचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे. संपा संदर्भात पालघर कामगार उपायुक्त कार्यालय येथे आयोजित केलेल्या बैठकीस आज सर्व कामगारांनी हजेरी लावली यावेळी प्रशासनास थोडेही कामगारांचे गांभीर्य नसून त्यांच्याकडून कोणीही हजर राहिले नाही. कामगार नेते अभिजीत राणे यांनी यावेळी कामगारांच्या सर्व मागण्यांची शासनपातळीवर नोंद करण्यात आली. यावेळी संप असाच सुरू राहील आपल्या पाठीशी धडक कामगार युनियन पूर्णपणे पाठीशी आहे असे सांगितले. यावेळी धडक कामगार युनियन चे जनसंपर्क प्रमुख कुणाल जाधव उपस्थित होते. दरम्यान, कामगारांनी पालघर जिल्हाधिकारी कार्यालय येथे ‘लढेंगे भी और जितेंगे भी’ अशा घोषणा देत एल्गार केला. कामगारांमध्ये भूषण कोळी, अनिल घरत, प्रभाकर पाटील, गणेश वर्मा, जितेंद्र पाटील, हेमेश चावरे, विनोद मेहेर, अशोक पाटील, भास्कर वझे, नारायण भोईर, कॅनेट गुरंग्या, संजय कुडू, गणेश पाटील, अनिल यादव, रमाकांत कुडू, राजेश कनोजिया आदी कामगार उपस्थित होते.