
बोरीवली येथील आकार एंटरप्रायझेसचे भागीदार आमू शाह, दिपक शाह, किरण शाह हे गुन्हेगारी प्रवेत्तीचे बांधकाम व्यावसायिक बोरीवली रेल्वे स्थानकालगत असलेली जवळजवळ २५० कोटी रूपये किंमतीची सिंधी समाजाच्या ट्रस्टची मालमत्ता मयत लोकांच्या खोट्या सह्या करून हडप करण्याचा प्रयत्न मागच्या १५ वर्षांपासून करीत आहेत.
परंतू या ट्रस्टच्या मालमत्तेचे काळजीवाहू व प्रस्तावीत विश्वस्त श्री. संजय छाब्रिया यांची सजगता व तत्परतेमूळे या समाजकंटकांना सदर मालमत्ता हडप करणे कठिण जात आहे. या समाजकंटक बिल्डरांनी त्यांच्या वाटेतील हा अडथळा दूर करण्यासाठी श्री. छाब्रिया यांच्यावर गुंडाकडून प्राणघातक हल्लाही करून त्यांना जबर जखमी करण्याचेही काम केलेले आहे. याआधीही खोट्या गुन्ह्यांत अडकवीण्याचाही प्रयत्न केलेला आहे.
परंतू तरीही त्यांचा मालमत्ता हडप करण्याचा हेतू साध्य होत नसल्याने या बिल्डरांच्या सांगण्यावरून चारकोप पोलिस ठाणे येथील काही भ्रष्ट पोलिस अधिकार्यांनी बोरीवली येथील सामाजिक कार्यकर्ते व माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. संजय छाब्रिया यांच्या विरोधात एका समाजकंटक महिलेला हाताशी धरून POCSO अंतर्गत गुन्हा नोंद केला. जेणेकरून श्री. छाब्रिया यांना पा-सहा महिने तुरुंगात ठेऊन खोट्या व बनावट दस्तऐवजांच्या आधारे न्यायालयीन आदेश प्राप्त करून या समाजकंटक बिल्डरला ही मालमत्ता हाडप करणे सोपे होईल.
सदर गुन्हा नोंद केल्यानंतर त्याआधारे या षड्यंत्रात सामिल असालेले चारकोप पोलिस ठाणे येथील भ्रष्ट पोलिस अधिकारी व कर्मचारी झुंडीने छाब्रिया यांच्या बोरिवली येथील राहत्या घराभोवती स्वतःची ओळख न सांगता संध्याकाळी अंधारात घिरट्या घालत राहीले व जबरदस्तीने घरात घुसून छाब्रिया यांचं अपहरण करून पोलिस ठाण्यात घेऊन गेले.
दुसर्या दिवशी मी मा. विशेष न्यायालय दिंडोशी येथे पोलिसांकडून मागणी होत असलेल्या पोलिस कोठडीसाठी घटनात्मक व कायदेशीर तरतूदी तसेच मा. सर्वोच्च न्यायालयाची मार्गदर्शक तत्वे याचा आधार घेत आक्रमकपणे विरोध केला व मा. न्यायालयानेही पोलिस कोठडी नाकारली. त्यानंतर लगेचच जामिनासाठी अर्ज करून मी श्री. छाब्रिया यांची सुटका केली.
या सर्व प्रक्रियेत श्री. छाब्रिया यांना कोणताही गुन्हा नसताना केवळ किचकट न्यायप्रणालीमूळे व मा. विशेष न्यायालयातील संवेदनहीन महिला न्यायाधीशामूळे जवळजवळ सात दिवस श्री. छाब्रिया यांना कोठडीत रहावे लागले.
सदर बाब मी मुंबईचे प्रामाणिक व कर्तव्यदक्षतेसाठी ख्याती असलेले मा. पोलिस आयुक्त श्री. संजय पांडे यांच्या निदर्शनास आणून दिली. मा. पोलिस आयुक्तांनी या गंभिर घटनेची दखल घेत सदर प्रकरणी चौकशीअंती फौ. का. प्र.च्या कलम १६९ अंतर्गत ‘बि’ समरी दाखल करून श्री. छाब्रिया यांची या खोट्या गुन्ह्यापासून मुक्तता केली. सदर प्रकरणी संबधित समाजकंटक महिला, भ्रष्ट पोलिस अधिकारी व बिल्डर यांच्यावरही कठोर कारवाई होणेकामी कायदेशीर प्रक्रिया अवलंबून त्याचा पाठपूरावा करीत आहे.
तसेच व्यापक जनहीत लक्षात घेता POCSO या कायद्याचा दुरूपयोग होऊन भविष्यात इतर कोणीही निरपराध अशाप्रकारे खोट्या अडकू नसे यासाठी मा. पोलिस आयुक्त यांनी राज्यघटना व मा. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांना अधिन राहून अशाप्रकरच्या कोणत्याही गुन्ह्यांची पोलिस अधिकार्यांनी दखल घेताना प्राथमिक चौकशीची प्रक्रिया अवलंबून अशाप्रकारे खोटे गुन्हे नोंद होण्या प्रकरणी पोलिस उपायुक्त अधिकार्यांपर्यंत जबाबदारी निश्चित करणारे परिपत्रक जारी केले.
यासाठी माझ्याकडून व इंडियन बार असोसिएशन या देशातील प्रमूख वकिलांच्या संघटनेच्या वतीने मुंबईचे मा. पोलिस आयुक्त श्री. संजय पांडे यांचे मनापासून आभार व अभिनंदन.