रिपब्लिकन टीव्ही चे एडिटर-इन-चीफ अर्णव गोस्वामी याने, कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गाँधींवर टिका करण्याच्या प्रयत्न-आडून देशात धार्मिक कलह पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करत, सोनिया गांधींवरील नाहक टीका ही अपमान जनक असून, अशा सार्वजनिक आपत्तीच्या काळात भडकावू वक्तव्य करून धार्मिक द्वेष स्वतःच्या कार्यक्रमा मार्फत पसरवणाऱ्या अर्णव गोस्वामीच्या विरोधात मिरा भाईंदर युवक काँग्रेस अध्यक्ष, दीप काकडे यांनी कनकिया पोलीस चौकीत तक्रार अर्ज केला आहे.

देशाची सर्वधर्मसमभावाची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न नजीकच्या काळात सतत केला जात आहे. लोकांवर सतत धार्मिक तेढ निर्माण करणारी नरेटिव्ह लोकांसमोर मांडून भाजप ने देशाच्या वातावरणात सतत कलहाचं विष कालवल आहे. जो पर्यंत धार्मिक द्वेष पसरवणाऱ्या अर्णव सारख्या लोकांवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा विकृतीला दुजोरा देणाऱ्या लोकांची संख्या कमी होणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *