
प्रतिनिधी :
धैर्य व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले रद्द करून दाखले बनविणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. सदर जातीचे दाखले बनविण्याकरिता आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात आलेली नसून आर्थिक व्यवहार करून हे दाखले देण्यात आले आहेत.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई उप विभागीय अधिकारी कार्यालयाकडून धैर्य नितेशकुमार वाघेला व योग नितेशकुमार वाघेला यांचे जातीचे दाखले बनविले गेले आहेत. जावक क्र. ४१६४६१३९७११ दि. १०/८/२०२१ रोजी योग नितेशकुमार वाघेला याचा जातीचा दाखला बनविला गेला आहे तर जावक क्र. ४१६४६१४०५२२ दि. १५/८/२०२१ रोजी धैर्य नितेशकुमार वाघेला याचा जातीचा दाखला बनविला गेला आहे. सदरचा दाखला बनविण्याकरिता जमा करण्यात आलेली कागदपत्रे १) सेंट अलॉयसीस हायस्कूलचा शाळा सोडल्याचा दाखला ज्यामध्ये जात व पोटजातीचा उल्लेख नाही. २) प्रतिज्ञापत्र ज्यामध्ये किशोर नितेशकुमार वाघेला यांनी आपली जात हिंदू भंगी असल्याचे नमूद केले आहे. ३) बालाभाई जेठाभाइ वाघेला यांचा शाळा सोडल्याचा दाखला आहे ज्यामध्ये शाळेचा शिक्काच नाही. धैर्य याचा जन्म दाखला ज्यामध्ये त्याचा जन्म मुंबईमध्ये झाल्याचे दिले आहे. जमा कागदपत्रांमध्ये कुटुंबातील एका ही सदस्याचा जातीचा दाखला नाही. नियमानुसार नवीन जातीचा दाखला देताना कुटुंबातील एका सदस्याचा जातीचा दाखला जोडणे आवश्यक असते. यावरून सदरचे जातीचे दाखले देताना नियमाचे उल्लंघन झाले आहे, हे स्पष्ट होते. ज्या ठिकाणी जन्म झाला आहे त्याच ठिकाणाहून जन्म दाखला घ्यावा लागतो. नियमानुसार सदरचे जातीचे दाखले मुंबई येथून घेणे आवश्यक होते. अशा अनेक चुका असून नियमाचे उल्लंघन करून दिलेले चुकीचे दाखले रद्द करून सदर प्रकरणी सखोल निष्पक्ष चौकशी व्हावी व दोषींवर योग्य ती कायदेशीर कारवाई करावी.अशाप्रकारे अनेक चुकीचे दाखले दिले गेले असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण वसई तहसीलदार व उप विभागीय अधिकारी कार्यालयात प्रचंड अंदाधुंद भ्रष्टाचार होत आहे. तरी सर्व दाखले तपासावेत. ज्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार झाल्याचे उघड होईल.