
दिनाक ०२/१२/२०२१ सागर शेत पेट्रोल पंप वर झालेल्या फसवणुक बाबत नंदकुमार महाजन यांनी तत्काळ त्याचं पेट्रोल पंप वरील तक्रार नोंद वहीत तक्रार नोंद करून भारत पेट्रोलियम कंपनी . पुरवठा अधिकारी वसई तहसिल कार्यालय.जिल्हाधिकारी पालघर. पुरवठा अधिकारी पालघर व वसई पोलीस स्टेशन येथे रीतसर तक्रार दिली. त्या मुळे चौकशी सूत्र पुढे सरकू लागल्याने धाबे दणाणले ने पेट्रोल पंप चालक ने या पुढे कोणत्याही ग्राहकाने अथवा नागरीकांनी तक्रार करून त्याच्यावर कायदेशीर प्रशासकीय तथा फौजदारी कारवाईसाठी पुढाकार घेऊ नये व त्याचा हा इंधन वितरण व्यवसायातला काळाबाजार असाच पुढे अविरतपणे निरंतर चालू रहावा या दुष्ट हेतूने सदर पेट्रोल पंप चालकाने नोटिस पाठवून दुष्ट हेतूने नंदकुमार महाजन यांच्या कडे ५०.००००० रू. नुकसान भरपाई व माफी मागावी अशी नोटिस व्दारे मागणी करून अप्रत्यक्षरीत्या अनुचित पने वसईतील सर्वसामान्य नागरिकांना धमकावण्या चा इशारा दिला आहे. परंतू त्यांची ही दादागिरी ला न जुमानता त्यास चोख प्रतिउत्तर नंदकुमार महाजन यांनी त्यांच्या नोटीस ला प्रति उत्तर देताना दिले आहे . मी माझे घटनात्मक कर्तव्य पार पाडले आहे आणि लोकाना जागृत करणे हा माझा मूलभूत अधिकार आहे असा खुलासा केला आहे.याबावत वर्तमान पत्रातील बातमी प्रसिद्ध झाल्या नंतर उत्स्फूर्त पणे नागरिकांनी ती बातमी समाज माध्यमावर वायरल केली. सदर पेट्रोल पंप वर अनेक नागरिकांची या पुर्वी फसवणूक झाली असल्याने नागरिकांनी असे संदेश फोन व प्रत्यक्ष भेटुन नंदकुमार महाजन याना भरघोस पाठिंबा दर्शवला काही वकील पत्रकार मंडळी देखिल त्यात सामील होते योग्य वेळी कोर्टात देखिल आम्ही साक्ष देण्यास तयार आहोत असे त्यांनी नंदकुमार महाजन याना आश्वासन दिलं आहे पेट्रोल पंप चालकाच्या नोटिस मध्ये परिच्छेद क्रमांक ०३ प्रमाणे क्लेम केला आहे . त्या प्रमाणे सदर पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल हेराफेरी बाबत तक्रार केल्यावर त्यांनी सर्वर रूम मध्ये ऑटोमेशन सिस्टीम दाखवली व नंदकुमार महाजन याना पाच लिटर पेट्रोल माप भरुन दाखवले असे धडधडीत खोटे सांगितल. जेव्हां असे काही त्यांनी केले नाही . नियमानुसार त्यांनी प्रत्येक ग्राहकाला पेट्रोल बाबत काही शंका असल्यास पेट्रोल पंप चालकाने सर्वर रूम मधिल सिस्टिम व पाच लिटर पेट्रोल त्याच मशीन वर चेक करून दाखवणे बंधनकारक आहे . हा ग्राहकाचा अधिकार आहे. पण असे त्यांनी काही न करता .नंदकुमार महाजन यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना धमकावले असे खोटं आरोप नोटीस द्वारे केला आहे म्हणून त्यांची सत्यता पडताळणी साठी सबधित नोटीस देणारे वकीला कडून सदर पेट्रोल पंप वरिल सी सी टीव्ही फुटेज प्राप्त करून घ्यावे. व शहानिशा करून सत्यता आढलून न आल्यास सदर वकिलांनी देखील आपल्या पदाचा दुरुपयोग करून मला धमकवण्याचा अनुचित प्रकार केला आहे त्या बाबत आपण महाराष्ट्र गोवा बार कौन्सिल कडे त्यांची रीपोर्टिंग करावी. असे पत्र वसई पोलिस स्टेशन वर देवून कारवाई ची मागणी नंदकुमार महाजन यांनी केली आहे.वसई सागर शेत इंधन वितरण केंद्रावरील फौजदारी पात्र गुन्हा आसलेल्या काळाबाजार विरोधातील नंदकुमार महाजन यांच्या प्रलंबित फौजदारी तक्रारी मध्ये ते स्वतः तक्रारदार बरोबर प्रमुख साक्षीदार ही आहे. म्हणून त्या बाबत पेट्रोल पंप चालक व संबंधित वकिलाने साक्षीदार स धमकवण्याचा आणखी एक गून्हा केला आहे असा दावा महाजन यांनी केला आहे त्या बाबत रितसर फौजदारी कारवाई करावी अशी विनंती. वसई पोलीस ठाण्यात नंदकुमार महाजन यांनी केली आहे . त्याचं बरोबर सागर शेत पेट्रोल पंप वर असलेली नियमबाह्य दुकान चे अनधिकृत बांधकामे केल्याबाबत महापालिका व भारत पेट्रोलियम कंपनी कडे पाठपुरावा सुरु आहे.त्यानुसार सदरअनधिकृत दुकाने कंपनी ने बंद केल्याची माहिती आहे .वसई विरार शहरात मोठया प्रमाणात पेट्रोल माफिया भेसळ व मीटर हेरा फेरी करून ग्राहकांची फसवणूक लूट करीत आहे या बाबत आता भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ते या सर्व पंप वर लक्ष ठेवून आहेत. सर्व ग्राहकांनी भारत पेट्रोलियम कंपनी च्या पंपावर कुणाची फसवणूक झाली तर न घाबरता कुठलाही वाद विवाद न करता 1800224344 या टोल फ्री क्रमांक वर तक्रार करावी तसेच त्याच पंप वरील तक्रार रजिस्टर नोद वहीत आपली तक्रार रजिस्टर करावी असे आवाहन भारतीय जनता पक्ष वसई शहर मंडळ च्या वतीने करण्यात आले आहे. काही अडचण आल्यास वा मदत लागल्यास सरचिटणीस अमित पवार. किरण पाटील मुकुंद मुळे. हेमा थॉमस सुचिता शेट्टी.रुपाली वर्तक रोजिना वर्तक मनमित राऊत स्वप्नील देवकर.राज सलियान .राहूल चौधरी प्रथमेश ब्राम्हनिया या पदाधिकारी शी संपर्क साधावा असे आवाहन नंदकुमार महाजन यांनी केले आहे