
आपल्या एकतीस वर्षाच्या नर्सिंग परिचर्या शिक्षण सेवक कारकिर्दीतील संपूर्ण अनुभव गाठीशी घेऊन मानव जातीला आणि समाजाला भविष्यात फायदा होईल,अशा पद्धतीने गेली आठ वर्षे सात महिने न थकता आणि कोव्हिड कालखंडात सुद्धा निराशेचे मळभ दूर करून अविरतपणे संशोधन कार्य सातत्याने पूर्णत्वास नेणारे श्री.रमेश शांताराम बांद्रे सरांचे समाजातून सर्वत्र कौतुक होत आहे. यु.जी.सी. मान्यता प्राप्त ,राजस्थान मधील ओ. पी.जी.एस. विद्यापीठातून त्यांनी ऑटीट्यु ड ऑफ स्टूडेंट नर्स आफेक्टिंग टू दि पर्सनलिटी डेव्हलपमेंट ऑफ ऑर्गायझेशन” पी.एच.डी पदवी अभ्यासक्रम असून, परिचर्या सेवा शुश्रूषा क्षेत्राला त्याचे व्यावसायिक स्वरूपात जनसामान्यांना लाभ होईल हा विषय घेऊन, यामध्ये रुग्ण,त्यांचे नातेवाईक,इस्पितळ व्यवस्थापन,सेवाकार्य,सोयी _ सुविधा त्यांचे हकक, अधिकार, कर्तव्य,इस्पितळ बांधकाम रचना, ग्रामीण – शहरी – डोंगराळ,जंगलात राहणारे,नदी – सागरी किनारपट्टी राहणारे आदी भागांतील लोकसंख्या , आरोग्यदायी वातावरण,आरोग्य व्यवस्थेवर पडणारा ताण आणि यातून समाजातील वंचित,आदिवासी,उपक्षित घटकाला मिळणारा लाभ आदी याचा सखोल अभ्यास त्यांच्या संशोधन कार्यात आहे
सेंट जॉर्ज रुग्णालय, छ.शिवाजी महाराज टर्मिनस येथील नर्सिंग कॉलेज मध्ये रमेश बाद्रे सर प्राचार्य पदावर असून अनेक सिस्टर, ब्रदर्स (विद्यार्थी – विद्यार्थिनी) त्यांनी घडविले आहेत.त्यांच्या ह्या संशोधनातून त्यांच्या अनुभवाच्या ज्ञानाचा परिपाक हे येणाऱ्या पिढीला सशक्त,सक्षम बनवून जबाबदारी नागरिक घडवतील अशी ह्या निमित्त प्रतिक्रिया त्यांच्या ह्या संशोधन कार्यात सर्वतोपरी सहकार्य करणारे आणि डिसोझा एज्युकेशन चॅरिटेबल ट्रस्टचे संचालक डॉ रॉबर्ट जी डिसोझा यानी व्यक्त केली.तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे गाइड श्री डॉ.सुरेश भोईदार सर आणि श्री भालचंद्र सर यांनी ह्या कोरोणाच्या कालखंडात प्रत्यक्ष गाठीभेट होत नसतानाही संपर्क तंत्रज्ञान, समाजमाध्यम याद्वारे सातत्याने सहकार्य मार्गदर्शन केले.तसेच त्यांचे कर्मचारी वृंद वर्ग ,ज्येष्ठ – कनिष्ठ सहकारी, विद्यार्थी – विद्यार्थिनी ह्या सर्वांचे सहकार्य असल्यामुळेच मी पी.एच.डी.पदवी पूर्ण करू शकलो त्या बद्दल त्यांनी आभार व्यक्त केले.
ह्या यशात माझ्या एकट्याचाच नव्हे तर समाजाचे आणि देशाचे ऋनत्व मान्य करून ह्या संशोधन कार्याच्या रूपाने समाजाला परतफेड करण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे.असे भावपूर्ण उदगार डॉ.रमेश शा. बांद्रे सरांनी व्यक्त केले.