

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा महसूल मंत्री माननीय नामदार बाळासाहेब थोरात साहेबांनी वसईचे सुपुत्र ,पर्यावरण प्रेमी, समीर सुभाष वर्तक यांची पर्यावरण सेलच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती केल्याबद्दल आज नालासोपारा पूर्व येथे वसई विरार शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस अम्मार पटेल आणि काँग्रेस नेते शाहिद शेख यांनी सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या सत्कार समारंभासाठी जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस रामदास वाघमारे, वाघोलीचे माजी सरपंच टोनी डाबरे, लॉरेन्स दोडती, मकसूद तसेच काँग्रेस नेते अल्ताफ सय्यद, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संदीप कनोजिया, अभिजित घाग, विक्रांत चौधरी, आमिर सय्यद तसेच असंख्य काँग्रेस प्रेमी व नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अम्मार पटेल, शाहिद शेख, डॉ तारिक खान, शमशाद खान, आमिर देशमुख आणि सहकारी यांनी मेहनत घेतली.