

मूप्टा चे विभागीय दोन दिवसीय चिंतन शिबिर खुलताबाद विश्रामग्रह औरंगाबाद येथे 13 व 14 फेब्रुवारी 2021 ला पार पडले.
या शिबिरात औरंगाबाद जालना नांदेड हिंगोली लातूर उस्मानाबाद बीड परभणी नाशिक मुंबई हिंगोली या सर्व भागा मधून सुद्धा शिक्षक वर्ग महिलावर्ग आवर्जून उपस्थित होता त्या सर्वांचे अभिनंदन
मुंबईतून या शिबिरास उपाध्यक्ष डॉक्टर संदेश वाघ सर सचिव अशोक कोळी आणि कार्यकारिणी सदस्य श्री पेटकर सर उपस्थित होते.
या चिंतन शिबिरात 13 तारखेच्या पहिल्या सत्रामध्ये मुप्टा संघटनेची संघटनात्मक बांधणी कशाप्रकारे करायला पाहिजे याबद्दल सखोल आणि विचारपूर्वक मांडणी प्राध्यापक भास्कर टेकाळे (इतिहास ) औरंगाबाद यांनी केली.
द्वितीय सत्रा मध्ये येणारे नवीन शैक्षणिक धोरण व त्यात शिक्षकाची भूमिका शिक्षक म्हणजे शालेय स्तरापासून पदवीत्तर विभागात शिकवणारे शिक्षक यांची काय भूमिका असायला हवी याबद्दल चे विवेचन- अतिशय अभ्यासपूर्वक रित्या प्राध्यापक अशोक नानवरे सर लातूर यांनी केले.
नवीन शैक्षणिक धोरणावर डॉक्टर संदेश वाघ यांनी सुद्धा त्यांनी केलेल्या अभ्यासा नुसार यामध्ये आरक्षण धोरणाचा अंतर्भाव करण्याकरता काय काय करायला हवे होते व त्यांनी केंद्र सरकारला केलेला पत्रव्यवहार यावर प्रकाश टाकला ही सर्व माहिती सर्व शिक्षक वर्गास जे उपस्थित होते त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त ठरली आणि शैक्षणिक धोरणावर विचार व विनिमय करण्यात आला.
याच विषयावरलातूरचे मार्गदर्शक व नांदेडचे श्री पंचशिल एकांबेकर सर यांनी सुद्धा अधिक प्रकाश टाकला.
नंतरच्या सत्रामध्ये शिक्षकांच्या काय समस्या आहेत याबाबत विचार करण्यात आला. याच वेळी माननीय आमदार विक्रम काळे यांच्या आगमन झाले
आमदार साहेबांनी शिक्षकांच्या समस्या त्यावर सध्या काय उपाय योजना चालू आहेत विशेष करून आत्ता जो शिक्षकांचा अनुदानित शाळांच्या अनुदानाची चर्चा केली नवीन काही येणार एक शासन निर्णय यांचा सारांश रुपात अंदाज दिला यामुळे सर्व शिक्षक वर्गामध्ये समाधान पसरले रात्री सव्वा अकरा वाजता तिसरे सत्र पूर्ण करण्यात आले.
दिनांक 14 फेब्रुवारी रोजी जो चिंतन शिबिराचा दुसरा दिवस होता यातील सदरील सत्र जवळपास दोन वाजेपर्यंत चालली या सत्रामध्ये लातूर येथून आलेले डॉक्टर हर्षवर्धन कोल्हापुरे यांनी अतिशय अभ्यासपूर्वक माहिती दिली
मुपता मध्ये काम करण्यासाठी एक विचार हवा आणि यासाठी आपल्याला अधिकाधिक लोकांपर्यंत जावे लागेल असे मांडण्यात आले आदरणीय शरदचंद्र पवार साहेब यांना मुप्टा अधिवेशना करता बोलवणे व नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षणाचा मुद्दा सांगणे हा विचार मांडण्यात आला
या कार्यक्रमाची सांगता नंतर आभार प्रदर्शन आणि झाली.
कुठलाही परिषदेत चिंतन शिबिरात भाग घेणाऱ्या लोकांची व्यवस्था राहण्याची व्यवस्था जेवणाची व्यवस्था हा एक मोठा भाग असतो आणि ह्या मध्ये श्री सुनील मगरे सर आणि त्यांच्या टीमने अतिशय सुंदर रित्या केली दोन्ही दिवस जेवण अतिशय उत्तम होते त्याबद्दल मुप्टा च्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन करण्यात आले
या शिबिरात नवीन शैक्षणिक धोरणात आरक्षणाचा अंतर्भाव करण्याकरता मराठवायातील सर्व जिल्ह्यात सर्व प्रथम आंदोलन लवकरच आयोजित करण्यात येईल असे सुनील मगरे भाऊं तर्फे जाहीर करण्यात आले