

वसई (प्रतिनिधी) मागील काही वर्षांपासून वसई विरार शहर महानगरपालिका मध्ये वरिष्ठ अधिकारी यांच्या मर्जी नुसार कुठल्याही प्रकारची शैक्षणिक पात्रता न तपासता किंवा कुठलीही चौकशी न करता केवळ आपल्या मर्जीतल्या कर्मचारी यांना वरची पदे दिली जात आहेत.. ह्याचाच प्रत्यय हा व वि श म पालिका मधील वैद्यकीय अधिकारी डॉ तबस्सुम काझी यांच्या रूपाने आला.. ह्या त्याच डॉ काझी आहेत ज्या सध्या कोविड 19 या महामारी च्या अत्यावश्यक सेवा काळात महानगरपालिका मध्ये मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. परंतु ह्या डॉ काझी यांना नागरिकांच्या जीवाची काळजी नसल्याचे कळते.. ह्यांना कुठल्याही क्षणी काही अतिप्रसंगी काळात फोन केले असता ह्यांचा मोबाईल बंद असतो.. अथवा त्या तो कॉल उचलत नाहीत.. कधी कॉल उचलला तर उडवा उडवी ची उत्तरे ऐकायला मिळतात अथवा सांगितलेल्या गोष्टीवर त्यांच्या मार्फत कुठलेही कार्य घडत नाही.. त्यामुळे नागरिक धास्तावले आहेत.. जर देवरूपी डॉक्टर च जर असे वागू लागले तर नागरिकांनी कोणाचा आधार घ्यायचा… ?? एखाद्या नागरिकाला आपत्कालीन सेवा मिळाली नाही आणि त्याच्या जीवाचे काही वाईट झाले तर ह्याचा मुख्य जबाबदार कोण…?? डॉक्टर तबस्सुम काझी यांचे हे वर्तन अतिशय अशोभनीय असून त्या कोणत्या पदावर कार्यरत आहे ह्याचा त्यांना विसर पडला आहे असे त्यांच्या निष्काळजी पणे वागण्या वरून कळते. तसेच महानगरपालिका आयुक्त यांनी कोणत्या मुद्द्यावर अपात्र व प्रमुख वैद्यकीय अधिकारी पदावर आवश्यक पात्रता नसणाऱ्या डॉ तबस्सुम काझी यांना प्रमुख वैद्यकीय अधिकारी म्हणून नियुक्त केले आहे.. असा सवाल नागरिक करत आहेत..