

नाना नानी पार्क विरार पूर्व परिसरात गीतांजली विद्यालय शाळेच्या जवळ फूटपाथ चेंबर ला जोडून असणारा रस्ता आणि फूटपाथ चेंबर हा बोगस रित्या बनविला गेला आहे. ह्यांच्या मध्ये अंदाजे 3 ते 3.5 ft खड्डा झाला असल्याने रस्त्या आतमधील माती पोखरत चालली आहे.हे आमच्या निदर्शनास आल्यावर तात्काळ एकत्व मित्र मंडळ,म.न.सेना व तडीपार ग्रुपने दखल घेतली. व तिथे लोकांच्या नजरेस येईल असे फळी व तुटलेल्या झाडाच्या फांद्या ठेवल्या. ज्यानेकरून कोणतीही जीवितहानी होणार नाही.शाळकरी मुले आणि इतर लोकांच्या रहदाराची पायवाट त्याच ठिकाणाहून असल्याने ही रहदारी धोक्याची सुद्धा होऊ शकते. तसेच स्थानिक नगरसेवक ह्यांना माहीत असून सुद्धा ह्या कडे काना डोळा करत दुर्लक्ष करीत आहे , म्हणून व.वि.श.म.चे आयुक्त आणि प्रभाग क्रमांक B मधील v.v.m.c चे अधिकारी ह्यांना विनंती की आपण ह्या ठिकाणी तसदी घेऊन लवकरात लवकर हे काम पूर्ण करावे. यावेळी आमच्या सोबत अखिल भारतीय संघटनेचे श्री. मुन्ना भाऊ, श्री रोशन शिगवण,श्री गोविंद देवरनादगी, तसेच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उप शहर अध्यक्ष श्री प्रफुल जाधव, श्री मिलन शिंदे, अखिल नाना नानी पार्क मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
,