

वसई : (प्रतिनिधी) : सध्या कोरोनासारख्या महामारीच्या काळात आर्सेनिक अल्बम-30 सारख्या गोळ्यांचे आज नायगाव ग्रमास्थ यांच्या वतीने वाटप करण्यात आले. या रोगप्रतिकार शक्तक्ी वाढवणार्या गोळ्या घेण्यासाठी नागरिकांनी सोशल डिस्टनशिंगचे पालन करून प्रतिसाद दर्शविला. सध्याच्या काळात कोरोनासारख्या आपत्तीवर या गोळ्या रामबाण उपाय ठरत असल्याने त्यांचचे वाटप सर्वस्तरावर करण्यात येत आहे. शनिवार दिनांक 6 जून 2020 रोजी सकाळी 11 ते 6 वाजेपर्यंत नायगाव कोळीवाडा, रोज नगर, मरियाम पार्क नायगाव पार्क, दरपाले, खोचिवडा अशा ठिकाणाहून नागरिकांनी या गोळ्यांचा लाभ घेतला. आत्तापर्यंत 3430 नागरिकांना या गोळ्या वाटण्यात आल्याचे नायगाव ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. नायगाव ग्रामस्थांनी स्वखर्चाने या गोळ्यांचे नागरिकांना वाटप केले. चांगले काम करताना अतीव समाधान मिळत असल्याचे यावेळी नायगाव ग्रामस्थांकडून सांगण्यात आले. कोरोनासारखी आपत्ती लवकर दूर होवो अशी प्रार्थना ते करत आहेत.