
नायलॉन धाग्याचा (मांज्याचा) वापर न करणे बाबत
प्लॅस्टिक/सिंथेटिक साहित्यापासून बनवलेल्या नायलॉन (मांज्यामुळे) धाग्यांमुळे पक्षी व नागरिकांना इजा होत असल्यामुळे पर्यावरण आणि हवामान बदल विभाग यांनी नायलॉन धाग्याचा वापर न करणे बाबत निर्देश दिले आहेत.
विषेशत: मकरसंक्रात सणानिमित्त पतंग उडवणे कामी नायलॉन धागा (मांजा) वापरण्यात येतो, प्लॅस्टिक किंवा अशा प्रकारच्या कृत्रिम पदार्थापासून बनवलेल्या नायलॉन (मांज्यामुळे) धाग्यांमुळे पक्षी व नागरिकांना इजा होत असल्यामुळे अशा प्रकारचा धागा नागरिकांनी वापरणे टाळावे, नायलॉन धाग्याऐवजी विघटन होणारे धागे बाजारात उपलब्ध असून त्यांचा वापर पतंग उडविणेसाठी करता येईल.
तसेच दुकानदार, उत्पादक, विक्रेते यांना अशा प्रकारचे नायलॉन धागे विक्री करण्यास बंदी करण्यात आली असून अशा प्रकारच्या नायलॉन धाग्याची (मांज्याची) ची हाताळणी, साठवणूक, विक्री करण्यात येऊ नये.
नायलॉन धागे हे विघटनशील नसल्यामुळे असे धागे कापून जमिनीवर पडल्यामुळे जमीन, पाण्याचे मार्ग तसेच गुरांच्या बाबतीत प्रतिकूल परिणाम होवू शकतो, अशा प्रकारच्या धाग्यांमुळे पर्यावरण आणि प्राण्यांना प्रचंड इजा होवू शकते. तसेच बहुतेक वेळा पतंग तुटल्यावर नायलॉन धागा विजेच्या तारांमध्ये अडकल्यामुळे वीजप्रवाह खंडित होणे, वीजपुरवठ्यात व्यत्यय येणे इ.अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अपघात, जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महानगरपालिका कार्यक्षेत्रातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते कि, नागरिकांनी नायलॉन धाग्याचा वापर टाळून पर्यावरण संवर्धन करावे व महानगरपालिकेला सहकार्य करावे.