पालघर – जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भगात सर्वत्र पाणी तुंबले व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी वसई -विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची टीका, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिल्लीहून केली आहे. सध्या संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू असून त्यासाठी गावित दिल्लीत आहेत.वसई, विरार, नालासोपारा येथे पाणी साचल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करतांना खासदार राजेंद्र गावित
वसई, विरार, नालासोपारा येथे पाणी साचू नये, यासाठी करोडो रुपये खर्चून नालेसफाई करण्यात आली होती. ही नालेसफाई पूर्णपणे झाली नाही. मग हा वापरलेला पैसा गेला कुठे? तसेच महानगरपालिकेने पाठीशी घालून उभारलेल्या अनेक अनधिकृत बांधकामांमुळे सर्व ठिकाणी पाणी तुंबले आहे. या सर्व पूरपरिस्थितीला वसई-विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याचे आरोप खासदार राजेंद्र गावित यांनी केला आहे. याबाबत आपण संसदेत प्रश्न उपस्थित करू. त्याचबरोबरीने आपत्ती व्यवस्थापनाचे पथक वसई, विरार नालासोपारा भागात येऊन पाहणी करेल. सोबतच पावसामुळे नुकसान झालेल्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचाही प्रयत्न करणार असल्याचे, खासदार राजेंद्र गावित यांनी सांगितले आहे.

जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वसई, विरार, नालासोपारा या भगात सर्वत्र पाणी तुंबले व जनजीवन विस्कळीत झाले आहे. यासाठी वसई -विरार महानगरपालिकेचे सत्ताधारी बहुजन विकास आघाडी जबाबदार असल्याची टीका, पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांनी दिल्लीहून केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *