

प्रतिनिधी (वसई) – विरार- वसई पूर्व पट्टीतील प्रतिष्टित कुटुंब असलेल्या चिमा पाटील उर्फ रामचंद्र पाटील यांची सून एडवोकेट कल्याणी किरण पाटील यांनी शुक्रवारी दुपारी आमदार रविंद्र फाटक, वसई शिवसेना जिल्हा प्रमुख वसंत चव्हाण, तालुकाप्रमुख निलेश तेंडोलकर, अल्पसंख्याक प्रमुख सलीम खान यांच्या उपस्थितीत वसई येथील शेल्टर हॉटेलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात शिवसेनेत रितसर प्रवेश केला.
एडवोकेट कल्याणी किरण पाटील या बहुजन विकास आघाड़ीच्या प्रभाग क्रमांक ४१च्या नगरसेविका एडवोकेट अंजली पाटील यांच्या नणंद आहेत. कल्याणी किरण पाटील
यांच्या शिवसेना प्रवेशामुळे बहुजन विकास आघाड़ीला शिवसेनेने दिलेला हा चेकमेट मानला जात आहे.
चिमाजी पाटील कुटुंबीय नालासोपारा-धानिव येथील प्रतिष्टित कुटुंब असून; व्यावसायिक, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे भरीव काम आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वसई तालुक्यातील अनेक जण शिवसेनेत प्रवेश करू इच्छीत आहेत. मात्र वेळेअभावी हे प्रवेश लांबणीवर पड़त आहेत. मात्र जे जे लोक इछुक आहेत त्या सगळ्यांचे शिवसेनेत स्वागत असेल.
-रविंद्र फाटक, आमदार, पालघर जिल्हा संपर्कप्रमुख