नालासोपारा पुर्व स्टेशनवर रिक्षा चालक मुजोर झाले आहेत.
स्टेशनला लागुन रिक्षा लावतात.
प्रवाशाना स्टेशनच्या बाहेर ही येण्यास रस्ता देत नाही.
यांचा त्रास प्रवाशांना आहे तसाच सामान्य जनतेला व परवाना असलेल्या रिक्षा चालक व मालकांना सुद्धा आहे.

अलकापुरी स्टँड ला रिक्षा चालवणारे हे अल्पवयीन आहेत.
बहुतेक अमली पदार्थांच सेवन केलेले असतात.
प्रवाशांना एकत्र येऊन दमदाटी करण, मारण हे नेहमीचच झाल आहे.
ह्या रिक्षाचा त्रास हा सर्वांना होतो.
मग ह्यानां कोणाचा पाठींबा आहे ?
डायरेट पहिला नंबर भरणे.
रस्ता आडवणे.
लाईसन्य किंवा ब्याच नसताना रिक्षा चालवणे.
अमली पदार्थांच सेवन करुन अल्पवयीन मुलांना रिक्षा चालवायची परवाणगी देणे.

ह्या सर्व गोष्टी आम्ही परिवर्तन लढा ग्रुप मध्ये असलेल्या सर्व पक्षाच्या पदअधीकार्यांनच्या मार्फत प्रशासनाला सांगीतल्या आहेत.
RTO चे अधिकार्यांना तर सतत 10 दिवस फोन करुन सांगीतल होत. तरि कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही.

सदर बाबा आम्ही (19 डिसेंबर 2018) रोजी

  1. भारिप बहुजन महासंघ (भारिप).
  2. आंतराष्ट्रीय मानवाधिकार समिती.
  3. भारतीय जनता पार्टी
  4. शिवसेना
  5. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

ह्या पक्षाच्या पदअधिार्यांनी एकत्र येऊन

  1. वाहतुक शाखा – वसई
  2. पोलीस निरीक्षक (नालासोपारा)
  3. उपप्रादेशिक अधिकारी RTO वसई-पालघर
  4. उप विभागीय पोलीस अधिकारी – नालासोपारा
  5. अप्पर पोलीस अधीक्षक – वसई
  6. पोलीस अधीक्षक – पालघर

या अधीकार्यांना लेखी तक्रार दीली होती.
तरिसुद्धा काहीही कारवाई झाली नाही.

नक्की ह्या रिक्षावंर पोलीस RTO कारवाई करत का नाही ?

ह्यांना कोणाचा पाठींबा आहे हे सांगण्याची गरज नाही.
सर्व जनतेला ते माहीती आहेच.
कीत्येक प्रवाशाना मारहाणी केलेले, प्रवाशांचे डोके फोडलेले गुन्हे पोलिस स्टेशन ला नोंद आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *