

आकाशची पत्नी कोमल (२०)रा.धनंजय स्टॉप, सोपारा गाव हिने काल सकाळी राहत्या घरी साडीचा वापर करून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तशी नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
याच ए.डी.आर. (आकस्मात निधन ) संबंधी आकाशला आज पोलीस ठाण्यात बोलविण्यात आले होते. याची कुणकुण त्याच्या मेव्हण्यालागली होती. तो आकाश ला धडा शिकविण्यासाठी तयारी करूनच पोलीस ठाण्यात पोहचला.आणि त्याने बेसावध असलेल्या आकाशच्या मानेवर व गळ्यावर धारधार चाकूने वार केले. रक्तबंबाळ झालेल्या आकाशने उपचारासाठी नेण्याआधीच प्राण सोडला होता.
पोलिसांनी रिद्धि विनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले, मात्र तो वाचू शकला नाही.
आपल्या बहिणीच्या आत्महत्येस आकाशच जबाबदार असल्याचा त्याला राग होता.
दुर्दैव म्हणजे कोमल कोळेकर ही ८ महिन्यांची गरोदर होती.
सर्जेराव कोळेकर हे माण तालुक्यातील म्हसवड जवळ राहणारे आकाशचे वडील.
या गुन्ह्यांचा तपास वरिष्ठ पोलीस अधिकारी करीत आहेत.
हे प्रकरण समजताच वसईचे उप विभागीय अधिकारी तातडीने नालासोपारा पोलीस ठाण्यात आले. आणि त्यांनी आपला तपास सुरू केला.