
नालासोपारा (प्रज्योत मोरे)
दिनांक 1 ऑक्टोंबर रोजी नालासोपारा पश्चिम
मंथन हॉल येथे नालासोपारा पोलीस स्टेशन
आयोजित नशा मुक्ती केंद्राचे शिबिर राबवण्यात
आले या शिबिरामध्ये प्रमुख पाहुणे म्हणून
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तलयाचे
सह आयुक्त चंद्रकांत जाधव उपायुक्त प्रशांत
वाघुंडे उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रमुख
मार्गदर्शक डॉक्टर सुरेश पाटील (एमडी
मनोविकार व सेक्स विकार विभास मानसोपचार
रुग्णालय विरार ) यांनी नशा मुक्ती विषयावर
मनुष्य कसा व्यसनाच्या आहारी जातो व त्यातून
व्यसन मुक्त कसे व्हावे व व्यसन व व्यसनाचे प्रकार
साध्या आणि सोप्या भाषेत मोलाचे मार्गदर्शन
केले तसेच डॉक्टर निलेश वानखेडे (साईदत्त
क्लिनिक नालासोपारा) यांनी नशा मुक्ती बद्दल
अधिक माहिती दिली या कार्यक्रमाचे आयोजक
नालासोपारा पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस
निरीक्षक विलास सुपे व त्यांच्या पोलीस
सहकार्याने केले होते वर्ष पहिले वर्धापन दिन
निमित्त नशा मुक्ती केंद्रा च्या शिबिरास असंख्य
नागरिकांनी व पोलिस बॉईज असोसिएशन चे पालघर जिल्हा उपाध्यक्ष प्रताप दुपारे वंचित बहुजन आघाडी मीडिया प्रमुख राजू लोखंडे नालासोपारा अध्यक्ष तेजस दुपारे उपस्थित होते