वसई विरार शहर महानगरपालिकेच्या नालासोपारा शहरातील पूर्वेकडील रुग्णालयाची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने पाहणी करण्यात आली.यावेळी डायलेसिसच्या 5 पैकी फक्त 2 मशीन सुरु तर 3 मशीन बंद अवस्थेत आढळून आल्या त्याचा जाब विचारत त्वरित सुरु करण्याची मागणी यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेनेचे नालासोपारा शहर सचिव श्री.राज नागरे यांनी केली.तसेच टी.बी या रोगाचे रुग्ण तपासले जातात कि नाही. कुत्रा चावल्या नंतरचे जे इंजेक्शन लागतात ते उपलब्ध आहेत कि नाही. याची पाहणी केली.नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महापालिका रुग्णालयाचे 3 ही मुख्य गेट खुले करून त्यावर सेक्युरिटी गार्ड नेमावेत तसेच रुग्णांना महापालिकेतून औषध गोळ्या उपलब्ध करून दयाव्यात रुग्णाना बाहेरून मेडिकल मधून आण्यास सांगू नये अशी मागणी मनसेचे शहरसह सचिव श्रीधर पाटेकर यांनी केली. महानगर पालिकेच्या मुख्य दरवाज्यावरच्या नाम फलकाची नावे गेल्या एक वर्षा पासून गळून पडलेली आहेत ती येत्या आठवडा भरात नव्याने लावून घ्यावेत अन्यथा मनसेच्या वतीने नामकरण फलक लावण्यात येईल असा इशारा तुळींज विभागअध्यक्ष समीर निकम यांनी दिला आहे.एक ना अनेक समस्याचे निवेदन सेंट्रलपार्क विभाग अध्यक्ष सैनिक मांगले यांनी सादर केले यावेळी शाखाध्यक्ष संतोष गुरव सह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.