
पालिका शासन नियमानुसार 50 हजार रुपयांचा दंड केला वसूल
महापालिका दिलेल्या सूचनांचे व नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई

नालासोपारा (प्रतिनिधी) :- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीरोग प्रतिबंधीत कायदा 1897 लागू करण्यात आला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसई विरार महानगरपालिका मार्फत नागरिकांना वेळोवेळी सार्वजनिक ठिकाणी मास्क परिधान करणे गर्दी न करणे एका मेका मध्ये सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी बाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
वसई विरार महानगरपालिका प्रभाग ब समिती तर्फे आशीर्वाद हॉल जाधव रेसिडेन्सी नालासोपारा पूर्व येथे दिनांक 14 में 2021 रोजी आयोजित करण्यात आलेले लग्न सभारंभा मध्ये कोविड-19 च्या नियमांचे उल्लंणघन करून मोठ्या प्रमाणात गर्दी असल्याचे निदर्शनास आले.त्यामुळे महापालिकाने संबंधित हॉल मालकावर कारवाई करण्यात आली असून लग्न सभारंभाचे आयोजन करण्याऱ्या आयोजकांकडे प्रभाग समिती ब कार्यालयाकडून शासन नियम नुसार 50 हजार रु दंड वसूल करण्यात आला आहे.
महापालिका क्षेत्रात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुभाव लक्षात घेता सर्व नागरिकांनी कोविडं-19 ची संबंधित महापालिकेने नियम चे पालन काटेकोरपणे करावे व महापालिकेला सहकार्य करावे.