


आज दिनांक 28 में 2021 रोजी नालासोपारा पूर्व येथील डॉ.आंबेडकर नगर येथील वरिष्ठ समाजसेवक प्रताप दुपारे यांच्या सामाजिक कार्यलयात मैत्री संस्थांचे बैठक घेण्यात आले त्या बैठकीत संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर युवाशक्ती एक्सप्रेस चे उपसंपादिका तेहसीन चिंचोळकर आणि वरिष्ठ पत्रकार व समाजसेवक प्रज्योत मोरे, पत्रकार /समाजसेवक विनायक खर्डे आणि समाजसेवक गोडबोले समाजसेवक तेजस दुपारे आणि वरिष्ठ समाजसेवक प्रताप दुपारे हे उपस्थित होते.येणाऱ्या पर्यावरण दिनी संस्थे मार्फत कार्यक्रम संदर्भात चर्चा घेण्यात आली तसेच सूरज भोईर यांनी संघटन बांधणी व यणारे कोरोना काळांत उदभवलेले प्रश्न त्यांनी मांडले व त्यावर त्यांनी उपस्थित असलेल्या लोकांना प्रबोधन केले या काळात आपण शासनाच्या नियम पालन करून सामाजिक अंतर ठेवून आपल्याला जमेल तसे लोकांना मदत करणे आणि येत्या पर्यावरण दिनी मैत्री संस्था मार्फत वृक्ष रोपण व कोरोना काळात मृत झालेल्या लोकांना भावपूर्ण श्रद्धांजलीचे कार्यक्रम ठेवणे असे अनेक विषय घेण्यात आले. या बैठकीत प्रताप दुपारे यांनी मोलाचे मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रम चा सांगता निरोप प्रज्योत मोरे यांनी केला, निरोप घेते वेळी वरिष्ठ समाजसेवक यांनी मैत्री संस्थेचे अध्यक्ष सूरज भोईर यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांना मान देण्यात आला तसेच युवाशक्ती एक्सप्रेस चे उपसंपादक तेहसिन चिंचोळकर यांना पण पुष्पगुच्छ देऊन मान देण्यात आले उपस्थित असलेल्या सर्व लोकांना पुष्पगुच्छ देऊन मान देऊन सांगता निरोप घेण्यात आला.