
नालासोपारा(प्रज्योत मोरे): 13 मार्च 2022 रोजी स्त्री दर्पण मासिक व क्राईम रिपोर्टर वेल्फेअर असोसिएशन च्या विद्यमाने नालासोपारा पूर्व येथे जागतिक महिला दिवस कार्यक्रम संपन्न झाला. तसेच कार्यक्रमामध्ये विविध समाजातील शैक्षणिक क्षेत्रातील देशाच्या आर्थिक प्रगती पथावर कार्यरत असणाऱ्या महिलांना सम्मान करून त्यांना मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच कार्यक्रमाची सुरुवात प्रथम ज्ञानाची देवी सावित्रीबाई फुले यांना पुष्पहार अर्पण करून तसेच दीप प्रजलवन करून प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आले. स्त्री दर्पण चे संपादिका व ज्युपिटर पब्लिकेशन्स च्या मॅनेजिग डायरेक्टर तेहसीन चिंचोळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले व शुभेच्छा देऊन सर्वाना प्रत्येक स्त्रीत्वाची जाणीव व्हावी या उद्देशाने स्त्री दर्पण मासिक सुरु केले आहे. तसेच कर्मवीर स्नेहा जावळे( जागतिक नाट्य निर्भया कलाकार) वरिष्ठ सामाजिक कार्यकर्ते, अध्यक्षा स्नेह बचत गट यांनी आपण महिला दिवस का साजरा करतात याची सविस्तर माहिती दिली आणि उपस्थित असलेल्या सर्वांना शुभेच्छा दिल्या. तर दुसरी कडे श्री.राज शर्मा क्राईम वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष यांनी सांगितले की प्रत्येक स्त्री जातीचा मी सम्मान करतो, स्त्री दर्पण च्या पुढील वाटचाली साठी मी व माझी सहकारी नेहमी सहकार्यात राहील.तसेच कार्यक्रमाची प्रमुख पाहुणे म्हणून सौ. मिनाज नदाफ महिला खेळाडू (मॅरेथॉन धावपट्टू) यांनी आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल थोडक्यात सांगितले की प्रत्येक स्त्री मध्ये एक रनर आहे फक्त तिला दर्पण मध्ये बघायची गरज आहे जेव्हा ती दर्पण मध्ये बघेल तेव्हा नक्की ती जिंकेल. इतर प्रमुख पाहूणे डॉ. कल्पना वारंग ,ऍड. किरण म्हात्रे, सौ रजनी गडा यांनी आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. प्रज्योत मोरे यांनी केले तसेच मनोरंजनाची भूमिका श्री.राजू लोखंडे ,सौ.उर्वशी उपाध्याय यांनी पार पाडली. तसेच तेहसीन चिंचोलकर यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांना शुभेच्छा देत बोलले की भविष्यात स्त्री दर्पण डिजिटल मीडिया मध्ये पदार्पण करणार आहे.

