नालासोपारा:(राजेश चौकेकर)शिवसेना काजुपाड़ा शाखा नालासोपारा प्रभाग क्रमांक.४६ विभाग क्रमांक.३ च्या वतीने बाळा साहेबांच्या स्मृतीदीनी अखंड हिंदुस्थानाचे कवचकुंडल, हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाहनाला अनुसरून दिनांक १७/११/२०२० रोजी शिवसेना काजुपाड़ा शाखा येथे बाळासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून बाळा सहेबांच्या प्रतिमेचे दर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली तसेच शाखा प्रमुख सुनिल भोंडवे शाखा संघटक भावना राऊत उपशाखा प्रमुख सचिन बटावळे महेश कांबळे शिवसेना कार्यकर्ते संतोष हंकारे जेसराज यादव शामराव जधाव सत्यम शुक्ला धनराज म्हापणकर महिला कार्यकर्त्यां रेश्मा अडबड यांनी उपस्थित राहून श्रद्धांजली अर्पण केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *