नालासोपाऱ्यातील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड हे प्रांताधिकारी यांना मुख्यमंत्री मदातनिधीचे चेक देताना छायाचित्रात दिसत आहे

नालासोपारा प्रतिनिधी : आज कोरोनासारख्या संसर्गामुळे लॉक डाउनसारख्या बिकट परिस्थितीशी गरीब व गरजू जनता झटत आहे. या परिस्थितीत अन्न व आरोग्याच्या दृष्टीने शासनाने जनतेपर्यंत जर मदत कार्य पोहोचवली तरी देखील ही मदत संपुर्णपणे या गरीब जनतेकडे पोहचत नसल्याने अशा स्थितीत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी गरीब गरजूंना आपले मदतीचे हात पुढे केल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. नालासोपारा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांनीही महामारीच्या काळात पुढाकार घेऊन गरीब गरजूंना धान्य वाटप करून मदत केली.तसेच त्यांनी वसई तालुक्यातील प्रांताधिकारी स्वप्नील तांगडे यांच्यामार्फत पंतप्रधान निधीसाठी रुपये रक्कम वीस हजार (20,000/-) चेक द्वारे देऊन ही जनतेची मदत केली.या पार्श्वभूमीवर लॉक डाउनमूळे गरीब जनता आर्थिक परिस्थितीशी लढत असताना त्यांना अन्न व आरोग्याच्या दृष्टीने शासनाद्वारे मिळणारी मदत वेळेवर न मिळाल्याने त्यांच्यावर उपाशीपोटी मरणाची परिस्थिती उद्धवताना सर्वत्र दिसून येत आहे.काही सामाजिक कार्यकर्त्यांनी व संस्थांनी एकत्र येऊन गरिबांना मदत करून मोलाची भूमिका बजावताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *