
एका अल्पवयीन मुलीसह तिघांची केली सुटका
नालासोपारा :- शहरातील एका इमारतीच्या दुकानामध्ये सलून आणि स्पा मसाजच्या नावाखाली चालणाऱ्या वैश्या व्यवसायावर मंगळवारी रात्री छापा टाकून अनैतिक मानवी वाहतूक शाखेने सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी एका अल्पवयीन मुलीसह दोन महिला अशी तीन पीडितांची सुटका करून दोन आरोपी विरोधात नालासोपारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
नालासोपारा पश्चिमेकडील छेडा नगरमधील करारी रेसिडन्सी सोसायटीच्या गाळा नंबर २ मध्ये अशाईन युनिसेक्स सलून अँड स्पा नावाचे दुकान होते. या स्पामध्ये वैश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे सदर ठिकाणी अनैतिक मानवी वाहतुक कक्षाचे पोलिसांनी छापा टाकला. पोलिसांनी एक अल्पवयीन मुलीसह दोन महिलांना आरोपी फिरोज अन्सारी आणि वसीम शेख या दोघांनी स्वतःच्या फायद्याकरिता तिघांना पैश्याचे आमिष दाखवून वैश्यागमन करीता प्रवृत्त करून वैश्याव्यवसाय चालवताना मिळून आले म्हणून नालासोपारा पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल केला आहे.