धरेंद्र कुलकर्णी वालीव प्रभाग सहआयुक्त यांना निवेदन देताना

वसई- पावसाळा चालू होण्यापूर्वी म्हणजे अजून महिना दीड महिना आहे; परंतु नायगाव पूर्वच्या लहान मोठ्यां नाल्यांची सफाईसाठी टाळे बंदी मध्ये बविआ नायगाव पूर्व अध्यक्ष धरेंद्र कुलकर्णी यांनी वालीव सह-आयुक्त सुरेंद्र पाटिल याना अर्ज दिले, या नालेसफाईत प्रामुख्याने नायगाव पूर्वच्या खाडीचे पावसाचे पाणी व मातीचा गाळ साचून गणेश नगर ,सिटीझन कॉलनीचा काही भागातील नाल्याचे पाणी साचते त्याची सफाई महानगर पालिकेकडून दर वर्षी JCB लावून गाळ साफ केला जातो.व बाकी इतर कोलन्या व रोजच्या आसपासच्या लहान मोठे नाले या नाल्यांचा सफाईचा समावेश आहे.केवळ पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थापन नव्हे तर रोग राई पावसाळी साथीच्या रोगावर नियंत्रण व परिसराची स्वछता या सर्व गोष्टींना लक्षात घेऊन हे नियोजन करण्यात येत आहे.तसेच वालीव प्रभागचे सभापती मा.कन्हैया भोईर यांनी हे काम लवकरात लवकर प्राधान्य देऊन करण्याचे आश्वासन दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *