

प्रतिनिधी :
वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील हेटकर आळी येथील साई निष्ठा अपार्टमेंट ते ग्रीन कोर्टपर्यंत बनविण्यात येत असलेल्या आरसीसी गटाराचे बांधकाम हे निकृष्ठ दर्जाचे असून सदर बाबत आयुक्तांनी चौकशी करावी व योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे व उप अभियंता प्रकाश साटम यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी युवा शक्ती एक्सप्रेसच्या कार्यकारी संपादिका रुबिना मुल्ला यांनी केली असून त्यांनी या संदर्भात आयुक्तांना पत्र दिले आहे.
या बाबतची अधिक माहिती अशी की, वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीतील हेटकर आळी येथील साई निष्ठा अपार्टमेंट ते ग्रीन कोर्टपर्यंत आरसीसी गटाराच्या कामाचा ठेका मे. आकाश कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आला आहे. दि. 8/12/2019 रोजीचा कार्यादेश असून 90 दिवसात काम पूर्ण करावयाचे होते. नियमानुसार वेळेत काम पूर्ण न केल्यास ठेकेदारावर कारवाई होते. तसेच सदरचे काम हे निकृष्ठ दर्जाचे असून कामाचा दर्जा संबंधित अधिकाऱ्यांनी तपासावा. नियम व अटींनुसार काम केले जात नसून सदर प्रकरणी कारवाई व्हावी.
निकृष्ट दर्जाचे बांधकाम होत असताना सदरची बाब उप अभियंता प्रकाश साटम यांच्या निदर्शनास आणून देऊन ही कारवाई केली जात नसल्यामुळे ठेकेदाराला प्रकाश साटम यांचे संरक्षण आहे आणि प्रकाश साटम व ठेकेदार आकाश कन्स्ट्रक्शन यांच्यात आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे स्पष्ट होते