
प्रतिनिधी :
वसईच्या तहसीलदार या अत्यंत मनमानी पद्धतीने काम करीत असून नियमांचे उल्लंघन करीत आहेत. उज्वला भगत चक्क जिल्हाधिकाऱ्यांची फसवणूक करीत असल्याचे त्यांनी केलेल्या फेरफार प्रकरणावरून सिद्ध झाले आहे.
नियमानुसार तहसीलदारांना ४० गुंठे जागेचे बिनशेती आदेश व फेरफार मंजूर करण्याचे अधिकार आहेत. असे असताना तहसीलदार उज्वला भगत यांनी तुकड्यांमध्ये फेरफार व बिन शेती आदेश पारित केले आहेत. गाव मौजे शिरसाड सर्वे नंबर ३३/९, क्षेत्र ५०.६००० आर. चौ. मी. या भूखंडाचा फेरफार दि. ३०/१२/२०२१ रोजी झालेला असून नियमानुसार ४० गुंठ्यांहून अधिक भूखंडाचा बिन शेती आदेश व फेरफार करण्याचा अधिकार नसताना तहसीलदार यांनी हे गैरकृत्य केलेले आहे. या गैरकृत्यात नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी सामील आहेत. त्याच प्रमाणे ससूनवघर येथील सर्वे नंबर ९८/१ क्षेत्र ०.८३.०० या भूखंडाचा फेरफार व बिनशेती आदेश दि. १४/१२/२०२१ रोजी मंजूर करण्यात आला आहे. वसई तहसीलदार यांच्या मनमानी कार्यपध्दतीबाबत सखोल चौकशी झाल्यास असे अनेक फेरफार व बिन शेती आदेश अधिकार नसताना तहसीलदार यांनी मंजूर केल्याची बाब उघड होईल. तहसीलदार एवढी मनमानी करीत आहेत आणि त्यांच्या विरुद्ध शासनाकडे असंख्य तक्रारी जाऊन ही कारवाई होत नाही, उज्वला भगत यांना शासन कशासाठी पाठीशी घालत आहे? जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी या प्रकरणी सखोल निष्पक्ष व उच्चस्तरीय चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी.
अधिकाऱ्यांना प्रत्येक निर्णय हा शासनाच्या नियमांनुसार घ्यावा लागतो. कामकाज शासनाने ठरवून दिलेल्या नियमांच्या चौकटीत राहूनच करावे लागते. कोणताही अधिकारी आपल्या मनमर्जी प्रमाणे काम करू शकत नाहीत. मग तहसीलदार नियमांचे उल्लंघन करून आपल्या मर्जी प्रमाणे काम कशा काय करतात, याबाबत सखोल चौकशी व्हावी.