
वसई : (प्रतिनिधी) : नालासोपारा पश्चिमेतील निर्मळ गावात काल (दि.5 मे) शेजारील कळंब गावातील 60 ते 70 जणांनी उत्तर भारतीय मजुरांना त्यांच्या गावी जाता यावे म्हणून प्रथमत: अर्ज भरण्याची खटपट करणारे निर्मळ गावातील रहीवाशी ब्रिजेश चौहाण यांच्या घरावर जमावाने हल्ला चढवल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर पालघरमधील गडचिंचले गावातील पुनरावृत्ती वसईत होता होता राहीली. मात्र या घटनेनंतर कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली असून जमावाने हल्ला करण्याच्या घटनांत होत असलेली वाढ चिंताजनक ठरली आहे.
सध्या राज्य शासनाने मुंबईत व ठिकठिकाणी अडकून पडलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी परवानगी अर्ज भरून घेण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे.
या मजुरांना त्यांच्या इच्छितस्थळी पोहोचते करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते ब्रिजेश चौहाण हे काम करत आहेत. मात्र उत्तर भारतीय मजुरांचे पहिल्यांदा अर्ज भरून देण्याच्या कारणावरून कळंब गावातील काही जणांनी ब्रिजेश यांच्या घरी येत त्यांच्या वडीलांना आनंदराम चौहाण आणि ब्रिजेश चौहाण यांना धमकावले. तसेच अश्लिल शिवीगाळी केली. ऐवढे करून समाधान न झालेल्या कळंब गावातील 60 ते 70 जणांनी ब्रिजेश चौहाण यांच्या निर्मळ येथील घरावर दगड, विटा आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला चढवला. यात रिमा चौहाण व त्यांचा मुलगा जखमी झाला आहे. या घटनेमुळे वसईतील कायदा-सुव्यवस्था धोक्यात आली आहे. याप्रकरणी वसई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करित आहेत

कळंब गावातील 60 ते 70 जणांनी केला हल्ला
निर्मळ गावातील रहीवाशी असलेले ब्रिजेश आनंदराम चौहाण हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. लॉकडाऊनमध्ये उत्तर भारतीय मजूर मोठ्या प्रमाणात नालासोपार्यात अडकून पडले आहेत. सध्या या मजुरांना त्यांच्या गावी जाण्याची परवानगी राज्य शासनाने दिली आहे. त्यामुळे या मजुरांचे अर्ज भरण्याचे काम सुरू आहे. या काळात सदरच्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी ब्रिजेश चौहाण हे मदत करत आहेत. मात्र या मजुरांचे अर्ज प्रथमत: भरून द्यावे या कारणावरून संतापलेल्या कळंब गावातील 60 ते 70 जणांच्या जमावाने बिज्रेश चौहाण यांच्या घरावर दगड, विटा आणि लोखंडी सळ्यांनी हल्ला चढवला. यात हल्ल्यात ब्रिजेश चव्हाण यांच्या पत्नी रिमा चौहाण आणि त्यांचा मुलगा जखमी झाला आहे.