
प्रतिनिधी : निर्मळ गावातील निर्मळ विद्यालय निर्मळ शाळेच्या सन १९९९-२००० (माजी विद्यार्थी १०वी-अ वर्गातील मुलानी एकत्र येऊन गरीब-गरजू मुलांना दप्तर वाटप केले. शालेय शिक्षण संपून २० वर्ष झाली, काहीजण व्यवसायात गुंतले काही सरकारी नोकरीत मोठ्या हुद्द्यावर गेले तर काही इतर शहरात भारताबाहेर कामा निमित्ताने ही गेले. पण ज्या शाळेनी आम्हाला घडवले त्याचे काय.? म्हणून आमच्या काही मित्र-मैत्रीणी मिळून थोडीशी रक्कम जमा करून शाळेतील काही गरीब-गरजू विद्यार्थ्यांना दिनांक २२ जून २०१९ रोजी
“दप्तर वाटपाचा” कार्यक्रम आयोजित केला. त्यावेळी त्या मुलांच्या चेहर्यावरील आनंद पाहून आम्ही सर्वजण भारावून गेलो आमची छोटीशी भेटवस्तू त्यांच्यासाठी फार मोठी होती. त्यासाठी आम्हाला मुख्याधापक कुडू मॅडम, टोंगरे सर, ईतर शिक्षक यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभले आणि हा उपक्रम “निर्मळ विद्यालय निर्मळ” शाळेत राबविणारी आमची पहीली बॅच ठरली ह्यासाठी आम्ही सर्व मित्र-मैत्रीणींचे मनापासून आभार मानतो व या पुढेही आमच्या हातून असे कार्य घडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. ह्या शाळेतील शिकून गेलेल्या सर्व माजी विद्यार्थ्यांना विनंती आहे की, जेव्हा जेव्हा आम्ही असा उपक्रम राबवू तेव्हा तुमची ही साथ असू द्या.
