

” निवडणुक अन कार्यकर्ता “
विधानसभा निवडणुक प्रचार जगो
जागी सुरु झाले .
उमेदवारा पेक्षा कार्यकर्ते प्रचारात
जास्त सक्रीय दिसले .
सुलभ शौचालयाच्या भिंती निवडणुक
घोष वाक्यांनी भरल्या .
स्मशान/ दफनभुमीच्या भिंतीवर २०१९ ला
आमचे साहेबच येणार लिखित दिसल्या.
हौशी/ अंध कार्यकर्त्यांचा प्रचार सुलभ
शौचालय ते स्मशान/ दफनभुमीत गेला.
नेता ईडी ,सी बी आय च्या चौकशीन
पुरता अडकुन बेजार झाला .
कार्यकर्ता ५०० रु , बिर्याणी , चपटीत
दिवसा प्रचारात तर रात्री नाचत सुटला .
युती फिफटी फिफटी वरुन सत्ताधारी
पक्षाच्या परड्यात पुरती गेली .
कार्यकर्त्यानी ६० ऐवजी ३०-३० मध्येच
लाचारीतली धन्यता पत्करली। ——————————-