
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
शांतता त्याना पहावत नाही
खेळ झाला पुन्हा सुरु
आमच्या अस्मितेवर घाव घालणारा
कोण तो अज्ञात माथेफिरू
निल्या नभानं बांधला गेलेला
खचनार नाही हा किल्ला
निषेध असो त्यांचा
ज्यांनी केला राजगृहावर हल्ला
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
इतिहास आहे साक्षिला
लागेल हळूहळू तुम्हासही कळायला
आमच्याशी वैर केले तर
जमीनही कमी पडेल पळायला
समदं कस शांत पाहुन
मारतोय इतिहासावर डल्ला
निषेध असो त्यांचा
ज्यांनी केला राजगृहावर हल्ला
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
आमची बौद्धस्थाने, बौद्धस्तूप
का खुपतात तुमच्या डोळ्यात
रान आमचं निळेशार बहरलेले
उगीच शिरु नका मळ्यात
हात उठताच माझ्या सैनिकाचा,
ढुंगनावरील पट्टा होईल तुझा ढिल्ला
निषेध असो त्यांचा
ज्यांनी केला राजगृहावर हल्ला
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴
जातीयवाद किती करणार हो?
समतेपुढे तू कसा टीकेल
एक न एक दिवस तुझी
मान भिमाच्या प्रतिमेसमोर झुकेल
विहाराशिवाय पर्याय नसेल तुला
जरी केलास किती ही कल्ला
निषेध असो त्यांचा
ज्यांनी केला राजगृहावर हल्ला
🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴🏴