वसई(प्रतिनिधी)-सध्या मनसे वसई विरार पालिकेचे आयुक्त गंगाथरण डी.विरोधात कमालीची आक्रमक झाली आहे. मंगळवारी मनसेने गंगाथरण डी.यांच्या दलनाबाहेर राडा केल्यानंतर पालिकेने बुधवारी मनसेचे नालासोपारा येथील शाखा तोडली होती. या कारवाईमुळे वसईत आयुक्त विरुद्ध मनसे असा संघर्ष उभा राहिला असून मनसेने थेट आयुक्तांचा अनधिकृत बंगला लक्ष केला आहे. या पार्श्वभूमीवर काल याच आयुक्तांच्या बंगल्यात वेठबेगारी सारखी वागणूक मिळालेल्या पदवीधर योगिता जाधवने सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल डीकून्हा यांच्या मदतीने मनसेचे पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली.त्यामुळे आता योगिता जाधव प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता वर्तवली जात असून मनसे
गंगाथरण डी. विरोधात आणखी आक्रमक होण्याची चिन्हे दिसत आहेत.योगिताने दोन आठवण्यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत मी दलित असल्यानेच माझ्यावर अन्याय झाल्यचा गंभीर आरोप आयुक्तांवर केला होता.विशेष म्हणजे योगीताला शैक्षणिक पात्रता असूनही ५ वर्षांत पदोन्नती दिली नाही,उलटपक्षी तिला आयुक्तांनी
स्वतः च्या निवासस्थानी घरगुती कामांसाठी जुंपल्याचे समोर आले होते.दुसरीकडे योगितावर झालेल्या अन्यायाबाबतचा विषय नालासोपारा येथील मनसे पदाधिकारी राज नागरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता.दरम्यान तिचा विषय पोस्ट केल्याने गंगाथरण डी.यांनी योगिताला कार्यालयात बोलवून हा विषय बाहेर का असे विचारत कामावरून कमी केले.कामावरून कमी केलेल्या योगीताने काल अविनाश जाधव यांची भेट घेऊन कैफियत मांडली.

 

नेमके प्रकरण काय?

योगिता राऊत (जाधव) सुरवातीला वसई विरार पालिकेच्या डी.एम.पेटिट रुग्णालयात अनुकंपा तत्वावर सफाई कर्मचारी म्हणून रुजू झाल्या होत्या. मात्र तिची शैक्षणिक
पात्रता व काम लक्षात घेऊन योगीताला लिपिकाचे काम दिले होते.परंतु नव्याने नियुक्त झालेल्या गंगाथरण डी. यांनी १८मे रोजी योगिता राऊत व अन्य दोन महिला कर्मचाऱ्यांना त्यांच्या मर्जीविरोधात वैयक्तिक कामासाठी ते राहत असलेल्या घरात घरकाम करण्यासाठी बोलवले व त्यांच्याकडून भांडी, कपडे धुण्याचे, झाडू पोछा करण्याचे,मासे सुटे करण्याचे काम करून घेतल्याचा गंभीर आरोप योगिता राऊत (जाधव) यांनी आयुक्तांवर केला आहे.विशेष म्हणजे बंगल्यावर काम करण्यासाठी पाठवणी करते वेळी पालिकेने कोणतेही नियुक्ती पत्र योगिताला दिले नाही.
दरम्यान सदर प्रकाराबाबत योगीताने वरिष्ठ अधिकारी, एस. आई. विकास पाटील यांना सूचित केले होते.पण पाटील यांनी त्यांच्या सदरच्या तक्रारीकडे लक्ष न देता मला अधिकार नाही असे सांगून या बाबी आयुक्त यांना भेटून वैयक्तिक स्तरावर सोडवण्याचा सल्ला देत
दुसऱ्या दिवशी योगिताला कोविड १९ आयसोलाशन केंद्र जी.जी. कॉलेज वसई येथे काम करण्यास सांगितले व कोरोना रुग्णांच्या चादरी, भांडी व संडास साफ करण्याचे काम करून घेतले.दुसरीकडे पालिकेचे सहा.आयुक्त सुभाष जाधव यांनी योगितावर दबाव टाकत
कामावर अनुपस्थित राहिल्याबद्दल नोटिस बजावत साफसफाई च्या कामांकरिता तात्काळ जी. जी कॉलेज मध्ये उभारलेल्या आयसोलेश केंद्रात रुजू होण्यास सांगितले होते.तसेच गैरहजर राहिल्यास शिस्तभंगाची कारवाई करण्याची ताकीद दिली होती.यासंदर्भात योगिता यांनी स्थानिक पोलीस ठाणे, तत्कालीन महापौर तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांच्याकडे न्यायासाठी मदत मागितली होती,मात्र तिला कोणीही न्याय दिला नाही.दरम्यान योगितावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी स्वप्निल डीकुन्हा,डॉ. भरतभूषण वर्मा यांनी सामाजिक माध्यमातून आवाज उठवला व उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले.उच्च न्यायालयाने यासंदर्भात टिप्पणी करताना म्हटले आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला ठरवून दिलेले कामच त्याला देण्यात आले पाहिजे.परंतु पालिकेने कोणतेच नियुक्तीचे आदेश न देताच परस्पर आयुक्तांच्या बंगल्यात खाजगी कामासाठी पाठवले होते.

आयुक्तांना त्यांची जागा दाखवून देऊ-अविनाश जाधव

दरम्यान न्यायासाठी मनसे दरबारी आलेल्या योगिता जाधवला अविनाश जाधव यांनी मनसे न्याय नक्कीच देईल असा विश्वास दिला आहे.तसेच मनमानी पणे कारभार हाकणाऱ्या गंगाथरण डी. यांना त्यांची जागा दाखवून देऊ असे सांगत आयुक्तांना लक्ष केले आहे.योगिता वर जर अन्याय केला तर या आयुक्ताच्या कानाखाली मारेन.योगीताच्या मागे वसई विरार मधील सामाजिक संस्था मध्ये काम करणाऱ्या सर्व महिलांनी खंबीरपणे उभे रहावे.आयुक्त हे स्वतः आय.ए. एस अधिकारी आहेत. त्यांना जर त्यांच्या वरिष्ठांनी स्वतःच्या घरी भांडी घासायला बोलाविले तर ते जातील का?मी केलेले आंदोलन रागाच्या भरात केल होतं.मी २-३दिवसात वसईत येतोय मला अटक करून दाखवावी,असे आव्हान जाधव यांनी आयुक्तांना केल आ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *