

वसई(प्रतिनिधी):वसईतील अंबाडी रोडवरील प्रमुख रस्त्यालगत पंचवटी हॉटेल शेजारी महापालिकेचा रस्ता आहे. जो तेथे असलेल्या जय चामुंडा, ज्योती बिल्डिंग, ब्रिज यु ह्या रहिवाशी इमारती राहणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव रस्त्या आहे. आणि रस्त्याच्या शेवटी महापालिकेने नागरिकांन कडून कराच्या रुपात गोळा केलेल्या पैश्यातून लाखो रुपये खर्च करीत लहान मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना व्यायाम करण्यासाठी जिजामाता नावाने ओपन जिम गार्डनची निर्मिती केलेली आहे. या इमारतीत राहणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना हे अगदी जवळचे गार्डन असून देखील येथील अडचणीमूळे नागरिक आणि मुलं त्या गार्डनमध्ये जाण्याचे धाडस करीत नाहीत असेच काहीसं चित्र आहे. नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत असल्याने मी स्वता आज या ठिकाणी गेलो असता तेथील परिस्थिती पाहून हे कळलच नाही की हा रस्ता करदात्या नागरिकांना गार्डनमध्ये किव्हा आपल्या राहत्या इमारतीत जाण्यासाठी तयार केलेला आहे की तेथील व्यावसायिकांना स्वताचा व्यवसाय करण्यासाठी तयार केलेला आहे. आज ह्या रस्त्यावर संपुर्ण तेथील ग्यारेज व्यावसाईकांचा आणि जुन्यागाड्यांचा व्यावसाय करणाऱ्यांचा कब्जा आहे. रस्त्याच्या सुरवाती पासून ते गार्डनच्या गेट पर्यंत म्हणजे रास्ता संपेपर्यंत संपूर्ण रस्त्यावर व्यावसायिकांच्या विक्रीस ठेवलेल्या गाड्या आणि ग्यारेजच्या निघालेल्या भंगाराचा भरणा आहे.आज जर तेथे काही इमर्जन्सी आली तर साधी फायर ब्रिगेडची गाडी किव्हा अंबुलेन्स ही जाऊ शकत नाही अशी भयाण परिस्थिती आहे. तेथील नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे या अतिक्रमना विरोधात तक्रार करून ही यांच्यावर काही कारवाई होत नाही हे विशेष. त्यामुळे उद्या येथे काही विपरीत दुर्घटना घडली आणि ह्या अतिक्रमणामुळे तेथे फायरब्रिगेटला किव्हा अबुलन्सला पोहचण्यात अडचण निर्माण होऊन मोठी विपरीत घटना घडली तर जवाबदारी कोणाची. तरी महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ह्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून नागरिकांना आणि त्या रस्त्याला मोकळा स्वास घेण्याची संधी द्यावी शेजारी महापालिकेचा रस्ता आहे. जो तेथे असलेल्या जय चामुंडा, ज्योती बिल्डिंग, ब्रिज यु ह्या रहिवाशी इमारती राहणाऱ्या नागरिकांसाठी एकमेव रस्त्या आहे. आणि रस्त्याच्या शेवटी महापालिकेने नागरिकांन कडून कराच्या रुपात गोळा केलेल्या पैश्यातून लाखो रुपये खर्च करीत लहान मुलांना खेळण्यासाठी आणि नागरिकांना व्यायाम करण्यासाठी जिजामाता नावाने ओपन जिम गार्डनची निर्मिती केलेली आहे. या इमारतीत राहणाऱ्या मुलांना आणि नागरिकांना हे अगदी जवळचे गार्डन असून देखील येथील अडचणीमूळे नागरिक आणि मुलं त्या गार्डनमध्ये जाण्याचे धाडस करीत नाहीत असेच काहीसं चित्र आहे. नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी येत असल्याने मी स्वता आज या ठिकाणी गेलो असता तेथील परिस्थिती पाहून हे कळलच नाही की हा रस्ता करदात्या नागरिकांना गार्डनमध्ये किव्हा आपल्या राहत्या इमारतीत जाण्यासाठी तयार केलेला आहे की तेथील व्यावसायिकांना स्वताचा व्यवसाय करण्यासाठी तयार केलेला आहे. आज ह्या रस्त्यावर संपुर्ण तेथील ग्यारेज व्यावसाईकांचा आणि जुन्यागाड्यांचा व्यावसाय करणाऱ्यांचा कब्जा आहे. रस्त्याच्या सुरवाती पासून ते गार्डनच्या गेट पर्यंत म्हणजे रास्ता संपेपर्यंत संपूर्ण रस्त्यावर व्यावसायिकांच्या विक्रीस ठेवलेल्या गाड्या आणि ग्यारेजच्या निघालेल्या भंगाराचा भरणा आहे.आज जर तेथे काही इमर्जन्सी आली तर साधी फायर ब्रिगेडची गाडी किव्हा अंबुलेन्स ही जाऊ शकत नाही अशी भयाण परिस्थिती आहे. तेथील नागरिकांनी वारंवार महापालिकेकडे या अतिक्रमना विरोधात तक्रार करून ही यांच्यावर काही कारवाई होत नाही हे विशेष. त्यामुळे उद्या येथे काही विपरीत दुर्घटना घडली आणि ह्या अतिक्रमणामुळे तेथे फायरब्रिगेटला किव्हा अबुलन्सला पोहचण्यात अडचण निर्माण होऊन मोठी विपरीत घटना घडली तर जवाबदारी कोणाची. तरी महानगरपालिकेने याकडे तातडीने लक्ष देऊन ह्या रस्त्यावरील अतिक्रमण हटवून नागरिकांना आणि त्या रस्त्याला मोकळा स्वास घेण्याची संधी द्यावी

