
प्रतिनिधी : वंचित बहुजन आघाडी वार्ड क्रमांक 51 व अरफन संस्था यांच्या सयुंक्त विद्यमानाने कारगिल नगर आंबोजवाडी मालवणी मालाड पश्चिम येथे नुकताच संपन्न झाले सदर शिबिरात स्थलांतरित लोकांसाठी मोफत आरोग्य शिबिर, तसेच HIV आणि गुप्तरोग तपासणी करण्यात आले असून सदर आरोग्य सेवेचा लाभ तेथील नागरीकांनी मोठ्या प्रमाणात घेतला सदर कॅम्प साठी संस्थेचे संजय वाघमारे (प्रोजेक्ट मॅनेजर) त्यांचे कर्मचारी व मुकेश वाकळे सर आणि शांतेश वाकळे व पंचशील कट्टा ग्रुप चे सहकारी यांनी शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतली. समाजउपयोगी कामात पंचशील कट्टा सतत अग्रेसर असतात पुन्हा एकदा जागेत उदाहरण पंचशील कट्टा यांनी दिली आहे. नागरीकांकडून त्यांचे स्वागत होत आहे.
