


आमच्या गावाला ‘रमाईनगर’ असे नाव द्यावे अशी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची व बुद्ध विहार समितीची मागणी होती. आणि ग्रामपंचायतचे सर्व सन्माननीय ग्रा.सदस्य यांनी ‘जांबूपाडा’ गावाचे ‘रमाई नगर’ नाव करण्याचा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला. आणि त्या नंतर नामकरणाच्या प्रकियेला वेग प्राप्त झाला आणि अथक पाठ पुरावा केल्या नंतर तब्बल पाच वर्षानंतर आज या नामकरण यशस्वीपणे करण्यात आला. आणि सर्व ग्रामस्थांच्या हर्षाला सीमाच उरली नाही. सर्व समाजातून लोक या नामकरण सोहळ्याला उपस्थित झाले होते. तसेच जि. प सदस्य शीतल धोडी, पंचायत समिती माजी सदस्य प्राची पाटील, अजय दिवे (पंचायत समिती सदस्य), विनोद भावर (पंचायत समिती सदस्य) तसेच विविध पक्ष व संघटनाचे अध्यक्ष व पदाधिकारी तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते व त्यांच्या उपस्थिती मध्ये रमाई नगर या नावाचे अनावरण करण्यात आले. आणि त्या नंतर धम्मरत्न बुद्धविहारात सर्व पुढील कार्यक्रम पार पाडण्यात आला. अनेकांनी या नामकरणाला शुभेच्छा दिल्या तसेच आपले मनोगत व्यक्त केले. पंचाळी रमाई नगर बुद्ध विहार समिती ला या नामकरणाचे मोठे योगदान आहे. या सोहळ्याला ललित जाधव , बिंबेश जाधव, बौद्धांचार्य संतोष जाधव, दिपक लोखंडे, विद्याधर म्हस्के, किरण जाधव, सुमनताई लोखंडे, दत्तात्रेय जाधव, भावना जाधव, मोहन भोणे व सूत्रसंचालक अजिंक्य म्हस्के तसेच या वेळी सर्व ग्रामस्थ, युवा व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि सर्वांच्या साक्षीने हा सोहळा यशस्वी पणे पार पडला.
Awesome post! Keep up the great work! 🙂