◆ पत्रकार सुरक्षा कायदा, मीडिया परिषद (मिडीया कौन्सिल),मीडिया कमिशन तयार करण्याची मागणी!

राष्ट्रीय पत्रकार रजिस्टर तयार करण्यासाठी उठविलाआवाज!

◆ राष्ट्रीय पत्रकार रजिस्टर तयार करण्यासाठी उठविलाआवाज!

 

24 जुलै 2020 नवी दिल्ली :- उत्तर प्रदेशच्या गाझियाबाद येथे पत्रकार विक्रम जोशी यांच्या हत्येच्या विरोधात इंटरनँशनल फेडरेशन ऑफ जर्नालिस्टस्, ब्रुसेल्सशी संलग्न नँशनल युनियन आँफ जर्नालिस्टस् इंडिया -दिल्ली आणि दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशनने,
कानपूर येथील पत्रकार शुभमनी त्रिपाठी, मध्य प्रदेशातील निवारी येथील पत्रकार सुनील तिवारी आणि एम्स दिल्लीतील पत्रकार तरुण सिसोदिया यांच्या संशयास्पद मृत्यूची न्यायालयीन चौकशी व्हावी या मागणीसाठी प्रेस क्लब ऑफ इंडिया ते पंतप्रधान कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढला.
या प्रसंगी पोलिस आणि निमलष्करी दलाच्या मोठ्या संख्येने तैनात जवानांनी बॅरिकेड्स लावून निषेध मोर्चाला मध्यभागी रोखले.
निषेध मोर्चा नंतर एनयूजेआयने पंतप्रधान कार्यालयाला निवेदन दिले. निषेध मोर्चाचे नेतृत्व करीत एनयूजेचे राष्ट्रीय अध्यक्ष रासबिहारी यांनी पत्रकार संरक्षण कायदा, मीडिया कौन्सिल आणि मीडिया कमिशन तयार करण्याची तसेच पत्रकारांना त्रास देणे, सक्तीची कामे, वेतन कपात आणि लहान व मध्यम वृत्तपत्रांच्या समस्यांकडे लक्ष देण्याची मागणी केली.

निषेधाच्या वेळी दिल्ली जर्नालिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष राकेश थपलियाल सरचिटणीस केपी मलिक, कोषाध्यक्ष नरेश गुप्ता, प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य आनंद राणा, एनयूजेच्या माजी कोषाध्यक्ष सीमा किरण यांनी संबोधित केले.
यावेळी अशोक किंकर, रणवीर सिंह, कुमार पंकज, सुजान सिंग, सुभाष चंद्र, सुभाष बरोलिया, बन्सीलाल, ज्ञानेंद्र, उषा पाहवा, दीप्ती अंगारिश, अंजली भाटिया, अशोक भरतवाल, फाजले गुफरन, राजेश भसीन, गोपीनाथ शमा, संजय गुप्ता, मनोज दीक्षित, नफेराम, प्रवीर दत्ता, अमित कुमार, सुभाष चंद्र, मनमोहन, ओमप्रकाश यांच्यासह मोठ्या संख्येने पत्रकारांचा सहभाग होता.

या निषेधावेळी संघटनेच्या नेत्यांनी सांगितले की, पोलिसांकडून संरक्षण मिळविण्याच्या मागणीनंतर पत्रकार विक्रम जोशी आणि तिवारी यांची हत्या करण्यात आली.
तिवारी या मध्य प्रदेशातील पत्रकाराने दोन महिन्यांपूर्वी आपल्या सुरक्षेसाठी विनवणी केली होती. यापूर्वी कानपूरमध्ये वाळू माफियांचा पर्दाफाश केल्याबद्दल पत्रकार शुभम त्रिपाठी यांची हत्या करण्यात आली होती.

पत्रकारांवरील वाढते हल्ले, बनावट खटले आणि बनावट पत्रकारांची वाढती गर्दी टाळण्यासाठी पत्रकार संरक्षण कायदा आणि राष्ट्रीय पत्रकार रजिस्टर तयार करण्याची गरज असल्याचे मत एनयूजेचे अध्यक्ष रासबिहारी यांनी व्यक्त केले. प्रेस कौन्सिलची शक्ती वाढविण्यासाठी आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांना या कक्षेत आणण्यासाठी मीडिया कौन्सिल तयार करण्याची गरज आहे.
पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने त्वरित प्रभावी पावले उचलली पाहिजेत, असे डीजेए अध्यक्ष राकेश थपलियाल म्हणाले.
डीजेएचे सरचिटणीस केपी मलिक म्हणाले की ,पत्रकारांच्या हत्येमुळे कायदा व सुव्यवस्थेची दुरावस्था समोर आली आहे. एनयूजेच्या वरिष्ठ नेत्या सीमा किरण म्हणाल्या की,अनेक ठिकाणी मदतीसाठी कव्हरेज करत असतानाही महिला पत्रकारांवर अत्याचार होण्याच्या तक्रारी वाढत आहेत. सरकारने गंभीरपणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *