

भुमाफिया अर्शद चौधरी व साथीदार यांच्या अनधिकृत बांधकामांवर पालिकेचा बुलडोझर फिरणार अशी ग्वाही मनपा आयुक्त अनिल कुमार पवार यांनी पत्रकार यांना देण्यात आले…
अनधिकृत बांधकामांवर कारवाईसाठी झालेला खर्च त्या भुमाफिया कडून वसूल करणार – आयुक्त अनिलकुमार पवार
वसई (प्रतिनिधी )पेल्हार येथील अनधिकृत बांधकाम करणारा भुमाफिया अर्शद चौधरी व त्याचे साथीदार 02 जुलै रोजी दै.मुंबई मित्रचे पेपर वितरक अभिषेक तिवारी यांस पेल्हार चौकी येथून अपरहण करून उमर कंपाऊंड येथील कार्यालयात नेण्यात आले तिथे बळ जबरीने कोंढण्यात आले व खंडणीसाठी जीवे मारण्याचा प्रयत्न केला. असे पेल्हार पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत.ते पण महाराष्ट्राच्या गृहमंत्री यांच्या आदेशाने मात्र भुमाफिया अर्शद चौधरी आणि त्याचे साथीदार यांची अनधिकृत बांधकाम निष्काशीत करून या भुमाफिया यांची मक्तेदारी व साम्राज्य नष्ट करण्यासाठी वसई तालुक्यातील अनेक पत्रकार संघातील पदाधिकारी व अधिक पत्रकार यांनी महापालिकेचे आयुक्त अनिल कुमार पवार यांची काल दिनांक १७ जुलै २०२४ रोजी भेट घेतली. या भेटी मध्ये भुमाफिया अर्शद चौधरी व त्याचे साथीदार यांचे अवैध बांधकाम प्रभाग पेल्हार, वालीव व चंदनसार येथे सुरू असलेले अनाधिकृत बांधकाम बांधकामाविषयी माहिती आयुक्तांना देण्यात आले आहे. मनपा आयुक्तानी पुढील आठवड्या पर्यंत सर्व सुरू असलेल्या अनधिकृत बांधकाम वर तोडक कारवाई करण्याचे आदेश दिले असून बांधकाम तोडण्यासाठी येणारा खर्च संबंधित बांधकाम करणाऱ्या व्यक्तीकडूनच वसूल करावा अशी सक्त ताकीद अधिकाऱ्यांना दिलेली आहे. लवकरच प्रभाग पेल्हार,वालीव व चंदनसार येथील अर्शद चौधरी व त्याचे साथीदार यांचे अनधिकृत बांधकाम जमीनदोस्त होईल अशी आशा पत्रकार मंडळी यांना सध्या वाटतं आहे.यावेळी महाराष्ट्र वृत्तपत्र संघटना, क्राईम न्यूज वेल्फेअर असोसिएशन व वसई विरार शहर महानगर पत्रकार संघचे सर्व पदाधिकारी,सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तसेच सर्व प्रभाग समितीतील अधिकारी,अभियंते लिपिक हे शासनाने सर्वसामान्य नागरिकांना भेटण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी वेळ राखून ठेवण्याचा जो अध्यादेश काढला आहे त्यानुसार ठराविक वेळ राखून ठेवायची आहे परंतु त्या राखीव वेळेत देखील हे अधिकारी सर्वसामान्य नागरिक,करदाते सामाजिक कार्यकर्ते,राजकीय कार्यकर्ते,पत्रकार व तक्रारदार यांना भेट देत नाहीत अथवा भ्रमणध्वनी संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर कॉल सुद्धा उचलत नाही, काही प्रभारी सह आयुक्त आपल्या दिलेल्या वेळेत देखील दालनात बसत नाही.
तर काही अधिकारी अभियंता,लिपिक कर्मचारी हे तक्रारदार, पत्रकार,सामाजिक कार्यकर्ते यांचा फोन देखील उचलत नाहीत तर काही अधिकारी हेतू पुरस्सर सर्वसामान्य नागरिकांना भेटण्याच्या वेळेमध्ये विनाकारण सामान्य नागरिकांना बाहेर तासनतास ताटकळत उभे ठेवतात . याबाबत योग्य सुधारणा कराव्या असं पत्र मनपा आयुक्तांना देण्यात आले. आयुक्तानी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या जातील असे शिष्टमंडळाला सांगितले. तर नव्याने झालेल्या कार्यालयामध्ये पत्रकारांना सुसज्ज सोयी सुविधांनी उपलब्ध असं पत्रकार कक्ष उपलब्ध करून द्यावा यासाठी देखील निवेदन देण्यात आले आहे व आयुक्तांनी तश्या प्रकारची व्यवस्था लवकरात लवकर केली जाईल असं आश्वासन सर्व पत्रकारांना दिले आहे.