नालासोपारा(प्रतिनिधी) :- बविआचे सभापती यांचे प्रताप नुकतेच उघडकीस असताना आणखी एका नगरसेविकाने रबर स्टॅम्प चा गैरवापर करून अत्यावश्यक सेवेचा पास स्वतःच्या सहीने वाटल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे. उत्तरप्रदेशातील नागरिकांना मोफत रेल्वेने पाठवण्याची सेवा प्रशासनाने सुरू केली आहे.या संधीचा गैरफायदा घेऊन नगरसेविका तथा सभापती सरिता दुबे यांनी अशा प्रवाशांकडून प्रत्येकी साडे सातशे ते एक हजार रुपये उकळल्याचा प्रकार सॊमवरी उघडकीस आला होता. त्यामुळे या नगरसेविकाचे पद रद्द करून तिच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर मंगळवारी आणखी एका नगरसेविकाचा प्रताप उघड झाला आहे.नगसेविका अनिता यादव यांनी विशेष कार्यकारी अधिकारी या स्टॅम्पचा गैरवापर करून स्वतःच्या सहीने व महापालिका नावाने अत्यावश्यक पास दुकानदार भाजीवाले आदी यांच्यासह अनेकांना सरसकट हे पास वाटले आहेत. हे पास बनविण्यासाठी तहसीलदार अथवा महापालिकेची कोणतेही परवानगी घेतलेली नाही त्यात नगरसेविकेने शासनाच्या तीन सिंहाच्या शिक्याचा देखील वापर बेकायदेशीरपणे केला आहे तिच्या ह्या कृत्यामुळे तिने कायदा तर मोडलेच आहे परंतु पर्यायी शासन प्रशासन आपणच आहोत अशी व्यवस्था तयार केली आहे.ही अतिशय गंभीर व धोकादायक आहे. ही बाब निदर्शनास आल्यावर मी वसईकर अभियान चे मिलिंद खानोलकर यांनी पुराव्यासह मा.जिल्हाधिकारी,मा.आयुक्त वसई विरार शहर महापालिका, मा.अप्पर पोलीस अधिक्षक वसई , मा.उपविभागीय अधिकारी वसई, मा.तहसीलदार वसई यांच्याकडे तक्रार केली आहे.संबंधित नगरसेविकावर गुन्हा दाखल करावा व महापालिका चे लेटर हेडच्या व पदाचा गैर वापर केल्याप्रकरणी तिचे नगरसेवक पद तसेच विशेष कार्यकारी दंडाधिकारी पद तत्काळ रद्द करावे असे मागणी मी वसईकर अभियान यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *