


प्रतिनिधी : जागतिक दर्जाचे महाकवी, विद्रोही साहित्यिक, लेखक, लोकनेते पद्मश्री नामदेव दादा ढसाळ यांच्या 74 व्या जयंती निमित्ताने जिल्हा पालघर तालुका मोखाडा येथील मौजे टाकपाडा या गावी दलित पॅंथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरोग्य मार्गदर्शन शिबिराचे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रमात तज्ञ डॉ. धर्मानंद मोरे यांनी कोविड 19 व विविध आजारांवर मार्गदर्शन केले तसेच संघटनेच्या वतीने मास्क ,सॅनिटायझर व विविध औषधांचे मोफत वाटप करण्यात आले.
यावेळी पालघर जिल्हा अध्यक्ष जगदीश राऊत, पालघर तालुका जिल्हा कार्याध्यक्ष अर्शद खान, महिला जिल्हाध्यक्ष मोहिनी जाधव, पालघर जिल्हा कोषाध्यक्ष भरत महाले, पालघर जिल्हा उपाध्यक्ष चेतन जाधव, लहानु डोबा, पालघर जिल्हा महासचिव संतोष कांबळे , पालघर जिल्हा सचिव शिवप्रसाद कांबळे, पालघर जिल्हा युवा अध्यक्ष ऍड. अजिंक्य मस्के, जिल्हा प्रमुख सल्लागार दिवाकर जाधव, पालघर जिल्हा तालुका अध्यक्ष किशोर राऊत, पालघर तालुका कार्याध्यक्ष उमेश कापसे, डहाणू तलासरी तालुका संपर्कप्रमुख तसेच डहाणू तालुका अध्यक्ष विनायक जाधव ,डहाणू तालुका कार्याध्यक्ष आफताब पठाण, डहाणू तालुका सहसचिव राकेश वाडिया, पालघर तालुका महिला सहसचिव पूनम जाधव, पालघर तालुका सहसचिव योगेश राऊत, वानगाव शहराध्यक्ष जिभाऊ अहिरे,सफाळे शहर उपाध्यक्ष सतीश शिवगण , सफाळे विभाग कार्यकारणी सुधाम सर्जेराव, चंद्रसेन ठाकूर, संकेत दिवे , वाणगाव शहर युवा अध्यक्ष तृनाल गवई,वाणगाव शहर युवा उपाध्यक्ष प्रतीक मेश्राम , चिंचणी शहर सचिव महेश पटेल असे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे आयोजन जव्हार मोखाडा तालुका संपर्कप्रमुख वसीम काझी, पालघर जिल्हा उपाध्यक्ष लहानु डोबा , पालघर जिल्हा प्रमुख सल्लागार मधुकर माळी, मोखाडा तालुका अध्यक्ष ईश्वर धोंडगा , जव्हार तालुका अध्यक्ष नितीन नितीन मुरर्थडे यांनी केले. यावेळी सदर कार्यक्रमात पद नियुक्ती करताना जव्हार मोखाडा तालूका संपर्क प्रमुख वसीम काझी , जव्हार मोखाडा तालुका सहसंपर्कप्रमुख इरफान शेख , वसई तालुका अध्यक्ष हरेश मोहिते ,वसई तालुका उपाध्यक्ष दीपक बाळकृष्ण मोहिते, नालासोपारा शहर अध्यक्ष मोहम्मद फैयाज शेख ,जव्हार तालुका उपाध्यक्ष उमेश जंगली, रेवजी गोंड,जव्हार तालुका उपकार्याध्यक्ष हाजी फरास ,जव्हार तालुका महासचिव विजय वरठा, जव्हार तालुका कार्याध्यक्ष प्रमोद थेतले, जव्हार तालुका सचिव दिनेश गोविंद, जव्हार तालुका सदस्य रामा वाणी, जव्हार तालुका सहसचिव मनोज दुधेडा, निलेश गोविंद ,सचिन कहवा, मोखाडा तालुका उपकार्याध्यक्ष सकरू वाजे ,मोखाडा शहर उपाध्यक्ष चंद्रकांत पवार ,मोखाडा शहर कार्याध्यक्ष गंगा आरडे, मोखाडा महिला अध्यक्ष अलका दिघा, मोखाडा तालुका महिला उपाध्यक्ष नशीला बांबरे, मोखाडा शहराध्यक्ष मोहन थेतले, जव्हार तालुका कार्यकारिणी सदस्य मधुकर घायल, मोखाडा तालुका सहसचिव विष्णू सुनाड, मोखाडा तालुका कार्यकारिणी सदस्य विठ्ठल मोहांडकर या कार्यकर्त्यांना नव्याने जबाबदाऱ्या व पद नियुक्ती करण्यात आले . सदर कार्यक्रमाची सुरुवात व प्रमुख पाहुण्यांचे स्वागत पारंपारिक सनई , संबळ, तारपा नृत्य व आदिवासी संस्कृती परंपरेने करण्यात येऊन कार्यक्रम यशस्वी केले.