वसई विरार मध्ये अक्षरशः परप्रांतीय चाळी माफियांचा हैदोस!

नालासोपारा:परप्रांतीय विकासक बहुतांश अनधिकृत बांधकामे उभारण्यात आणि फसवणूकी च्या बाबतीत अग्रेसर असल्याचे चित्र सध्या वसई विरार मध्ये दिसत आहे.विकासाचा हेतू दाखवून आम जनतेला फसवून चाळी माफिया आपले खिसे भरण्याचे काम याठिकाणी करत आहे.उदानार्थ बिलालपाडा,कुंभारपाडा,राजीवली,फुलपाडा, चिंचोटी आणि मुंबई अहमदाबाद मार्गाजवळची काही गावे यामध्ये प्रामुख्याने सामील आहेत.गावातील स्थायिक लोकांना कडून कवडी मोलाने जमिनी खरेदी केली जाते.त्यामुळे गावातील स्थायिक आपल्याच राज्यात पाहुणा होत चालला आहे.परप्रांतीय विकासक आपल्या गावची जमीन विकून शहरात कमी दरात शासकीय ,आरक्षित,वनविभागाच्या जमिनी खरेदी करतात व अधिकाऱ्यांशी हातमिळवणी करून अनधिकृत बांधकामे उभारून आम जनतेला फसवण्याचा गोरख धंदा सुरू करतात.प्रामुख्याने फसवणूकीचे शिकार होणारे लोक अश्या परप्रांतीयांचे नाते संबंधातातले किंवा गाव संबंधित असतात. बिचारे शहरात येऊन आपल्याच्या माणसांकडून फसवल्याचे दुःख काय असते ते फसवणूकीचे शिकार होणाऱ्या परप्रांतीयांनाच माहित असावे.

वसई विरार शहर मुंबई पासून जवळ असल्याने लोक आकर्षित होतात. प्रत्यक्ष गरीब किंवा मध्यमवर्गीय जनतेला स्वतःच घर घेण्याचे स्वप्न असते.असे स्वप्न पाहणाऱ्या जनतेचा फायदा चाळ माफिया घेतान दिसतात. आम जनतेला कमी किंमती सांगुन व्यवहार केले जातात.त्यांना अंधारात ठेवून संपूर्ण बांधकाम अधिकृत आहे असे भासवले जाते परंतु सदर जमीन पुढील काळात सरकारी,शासकीय, आरक्षित आणि वनविभागाची आढळून येते त्याठिकाणी कारवाई केली जाते ,तोपर्यंत परप्रांतीय विकासक आपल्या गावी पळालेला असतो. त्यावेळी आम जनतेला समजते की आपली फसवणूक झाली आहे.मग पोलिसात गुन्हा दाखल केला जातो परंतु कालांतराने काही कारणास्तव पोलीस विभाग परप्रांतीय विकासक असल्याने गुन्हेगाराला पकडायला वेळ लागतो.अश्या फसवणूकी होऊन सुद्धा वसई विरार मध्ये अनधिकृत चाळी बांधकामे दिवसो`नदिवस वाढत चालली आहेत आणि गरीब जनता फसवणूकी मध्ये मोठ्या प्रमाणात भरडत जात आहे.निसर्गरम्य परिसर आणि मुबलक दरातील घरांच्या आमिषांना बळी पडत शेकडो घरे घेतलेली हजारो कुटुंबे सध्या हतबल झाली आहेत. शहर विकसित होत असताना हजारो कुटुंबांना फसवणुकीच्या छायेत ढकलणारे स्थानिक लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाच्या डोळेझाक भूमिकेविरोधातही संताप व्यक्त केला जात आहे. लोकप्रतिनिधी, बांधकाम व्यावसायिक आणि संबंधित हातमिळवणी करून परवानग्या देणाऱ्या प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत हजारो कुटुंबांना कायमस्वरूपी फसवणुकीच्या छायेत ढकलल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहे. त्यामुळे शहरात नवीन वास्तव्यास येणाऱ्या आणि अनधिकृत घर घेणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये, यासाठी प्रशासनाने ठोस नियमावली तयार करावी, अशी अपेक्षा शहरवासीयांनकडून होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *