वसई, प्रतिनिधी – वसईतील चौबारे गावातील सीटीएस क्रमांक 2879, 2881 आणि 2882 या भूखंडांवर उभारलेली Anwar Mansion ही सात मजली इमारत केवळ एक अनधिकृत बांधकाम नाही, तर भ्रष्टाचार, बिनधास्तपणा आणि प्रशासनाच्या संगनमताचं ज्वलंत प्रतीक ठरली आहे.

फक्त पाच मजल्यांचीच परवानगी घेऊन थेट सात मजली ‘Anwar Mansion’ उभारण्यात आली.
त्यात बाहेरून पत्र्याचे शेड्स, बेकायदेशीर कार पार्किंग व्यवस्था, आणि सर्वात गंभीर म्हणजे – बनावट कागदपत्रांवर सामान्य जनतेला फ्लॅट विक्री करून सरळसरळ फसवणूक.

जेव्हा या प्रकारावर सवाल उपस्थित करण्यात आला, तेव्हा संबंधित व्यक्तीने सरळ उद्दामपणे ठणकावलं –

“हो, मीच सात मजली इमारत (Anwar Mansion) बांधली! काय करणार आहे? आहे का माय का लाल जो ती इमारत तोडून दाखवेल?”

Anwar Mansion आणि Chinmay Apartment – दोन्ही ठिकाणी बिनधास्त फसवणूक!
‘Anwar Mansion’ मधील सर्व फ्लॅट बनावट कागदपत्रांवर विकले गेले, आणि गरिब जनतेला सरळ लुबाडलं गेलं.
त्यानंतर आणखी धक्कादायक प्रकार म्हणजे पापडी येथील ‘Chinmay Apartment’!

‘Reliable’ प्रकल्पात O.C. न घेता विक्री केल्यानंतरही, संबंधित व्यक्तीला ‘Chinmay Apartment’ या इमारतीचं पुनर्विकास करण्यासाठी परत एकदा C.C. दिलं जातं.
हे सगळं नगररचना अधिकाऱ्यांच्या मूक सहमतीतच झालं असल्याचा आरोप आहे.

नगररचना अधिकारी Y.S. रेड्डी यांचं खुलं संरक्षण? – नय्यर मिसाळ यांचा आरोप
समाजसेवक नय्यर मिसाळ यांनी यावर संतप्त प्रतिक्रिया देताना स्पष्ट विचारलं –

“O.C. नसताना फ्लॅट विक्री, MRTP कायद्याचा भंग, आणि तरीही एकामागोमाग दुसऱ्या प्रकल्पासाठी C.C.?
हे सर्व नगररचना अधिकारी श्री. Y.S. रेड्डी यांच्या मंजुरीशिवाय शक्यच नाही.
Chinmay Apartment चं C.C. ही त्यांच्याच सहीनं मिळालंय. हे फक्त लुटीचं खुलेआम साम्राज्य आहे.”

हैदराबादवर ईडीचा छापा – ३२ कोटींची मालमत्ता उघड
Y.S. रेड्डी यांच्या हैदराबादमधील निवासस्थानी ED च्या छाप्यादरम्यान तब्बल ३२ कोटींची रोकड, सोनं आणि मौल्यवान वस्तू सापडल्या.
त्यांच्या पगारात हे शक्य नाही, हे लपून राहिलेलं नाही.

नालासोपाऱ्यात ४१ बेकायदेशीर इमारतींना C.C. – शेवटी कोर्टाच्या आदेशावर तोडकाम, हजारो बेघर!
नालासोपाऱ्यात देखील ४१ अनधिकृत इमारतींना C.C. देण्यात आला.
पण न्यायालयाच्या आदेशावर त्या सर्व इमारती तोडण्यात आल्या – आणि हजारो कुटुंबं रस्त्यावर आली.
नगररचना अधिकारी श्री. रेड्डी यांना पैसे मिळाले, पण जनतेचं आयुष्य उद्ध्वस्त झालं.

“फसवणूक, अनधिकृत इमारती आणि अब्रूची लक्तरं – कायद्याचा खेळखंडोबा कधी थांबणार?”
समाजसेवक नय्यर मिसाळ यांचा ठणकावलेला सवाल –

“Chinmay Apartment असो की Anwar Mansion – कायद्यातून खेळ करून जनतेला लुबाडलं गेलं.
FIR नाही, तुरुंग नाही, कारवाई नाही!
शासन झोपलंय की भ्रष्टांची साथ देतंय?”

सरकार आता तरी जागं होईल का? – अन्यथा लोकांचा उद्रेक अटळ!
Anwar Mansion, Chinmay Apartment, Reliable – ही केवळ नावं नाहीत, ही सामान्य माणसाच्या स्वप्नांची राख होण्याची कथा आहे.
आता सरकारने कठोर निर्णय घेतला नाही, तर हे भ्रष्ट कुचंबणाचं चक्र संपणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *