वसई, तहेसीन चिंचोलकर : 8 मार्च जागतिक महिला दिवस नुकताच साजरा झाला तरी महिलांचे आरक्षणाचे प्रश्न काय सुटेना. असाच एक प्रश्न वसई विरार शहर मनपा परिवहन समिती अंतर्गत दिसून येते तो म्हणजे, परिवहन समितीच्या नवीन सुरु केलेल्या बसेस ज्या वसई पूर्व कडून, सातिवली, रेंज ऑफिस तसेच हायवेकडे चालणाऱ्या नवीन बसेस ज्यामध्ये महिला, जेष्ठ नागरिक, अपंग व गरोदर स्त्रीन्साठी असणारी आरक्षित जागेवर अजून पर्यन्त आरक्षित स्टिकरची पाटी लावले दिसत नही. ज्याच्या फायदा इतर पुरुष प्रवासी घेऊन तिथे बसतात त्यामुळं प्रत्येक महिलाना अशा पुरुष वर्गाकडून नाहक त्रास सहन करावा लागत आहे. एखादी सीट वर बसण्यासाठी जर कोणी महिला विचार पूस केली असता त्यांना इथे आरक्षित पाटी लावलेली नाही असे प्रतिउत्तर मिळते.
महिलांच्या आरक्षित सुविधांकडे परिवहन समिती लक्ष कधी घालणार? इतर ठीकाणी सर्व बसेस मध्ये अशा प्रकारच्या आरक्षित जागे अगोदर नोंद असते परंतु इथे गेले कित्येक वर्षे या महिने उलटून ह्याकडे स्थानिक परिवहन प्रशासन दुर्लक्ष करीत आहे, असे प्रश्न प्रवासी महिलांकडून येत आहे. मनपा प्रशासनाने या प्रकरणाकडे लक्ष द्यावे असे महिला प्रवासी कडून मागणी आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *