

वसई(प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन समिती, वसई विरारचे समन्वयक आणि काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य समीर सुभाष वर्तक यांची दिनांक 13 जून रोजी वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आयुक्तांशी झालेल्या भेटीतील चर्चेनंतर 11 वर्षे रखडलेल्या 69 गावांच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेसाठी (जी योजना पूर्ण होऊन या 69 गावांतील नागरिकांना प्रत्यक्षात पाणी मिळेल का?) जे पाईप टाकण्यासाठी जे *वाघोली ते निर्मळ आणि वाघोली ते सोपारा खणलेले रस्ते तसेच नाळे पसायदान च्या समोरील मधोमध खणलेला रस्ता व होली क्रॉस शाळा, निर्मळच्या गेटसमोरील मधोमध खणलेला रस्ता* जे अजूनही दुरुस्त केलेले नाहीत आणि यावर सातत्याने अपघात घडत आहेत यासाठी आयुक्तांकडून आलेल्या आदेशानुसार आजपासून पाईपलाईन साठी खणलेले रस्ते दुरुस्त करण्यास सुरुवात केलेली आहे.
*सोमवारी नाळे पसायदान सेंटर समोरील रस्ता आणि होली क्रॉस शाळा , निर्मळच्या गेटसमोरील पाइपलाईन साठी खणलेला रास्ता दुरुस्त करण्यात आलेला असून* आणि इतरही पाईपलाईनसाठी खणलेले रस्ते येत्या दोन दिवसांत दुरुस्त होणार आहेत.
तातडीने हे धोकादायक खड्डे बुजविण्याचे काम सुरू केल्याबद्दल समीर वर्तक व गावकऱ्यांनी मा. आयुक्त व अति आयुक्तांबद्दल आभार व्यक्त केले.
समीर सुभाष वर्तक