
नालासोपारा, तेहसीन चिंचोलकर : नालासोपारा पूर्व विभागातील पश्चिम रेल्वे टिकिट खिडकीतील सर्व atvm मशीन चे कामकाज अगदी मंद गतीने चालू त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. रेल्वे प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येते.
कोरोना काळा वर नियंत्रण आणून देशाने जरी देश वासियांना दिलासा दिला असला तरी प्रत्येक नागरिक आज आर्थिक दृष्टी ने सबळ नही. आपली आर्थिक परिस्थिती सक्षम करण्यासाठी प्रत्येक नागरिक दररोज झटत आहे. अशातच नालासोपारा हुन चर्चगेट कडे प्रवास करणाऱ्या प्रत्येक प्रवासी ला तिकिटाच्या मोठ्या रांगेत उभे राहून तो आपले स्थानक वेळेवर गाठत नाही कारण atvm मशीन द्वारे त्या नागरिकाला लांब रांगेतुन लवकर सुटका मिळत नाही कारण असे की ह्या माशीन अगदी मंद गतीने चालत असल्यामुळे खूप त्रास सहन करावा लागत आहे. तिकिटाचे प्रोसेस पूर्ण झाले तरी त्याचे तिकीट मशीन मधून निघायला 2-4 मिनिट लागतात असे का? याचे प्रोसेस एवढे मंद का नेटवर्क स्पीड असून ही अशा पद्धतीने रेल्वे प्रशासन नागरिकांना का हैराण करीत आहे? तिथेच काही मशीन व तिकीट खिडक्या ही बंद असतात. ऐन कार्यालयीन वेळेत रेल्वे कडून अशी सुविधा मिळत आहे.
रेल्वे प्रशासन मशीनची वेळोवेळी दुरुस्ती का करून घेत नाही असे प्रत्येक नागरिकांचे प्रश्न आहे. याकडे रेल्वे प्रशासने दखल घ्यावी.