प्रतिनिधी : वसई तालुका हद्दीत पाचुबंदर येथील शासकीय गोदामात धान्याची अफरातफर होत असून धान्याच्या पुरवठ्याबाबत लेखा परीक्षण व्हावे व अफरातफर प्रकरणी दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी.
वसई पुरवठा विभागात मोठा भ्रष्टाचार होत असल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रसिद्ध होत असून गोरगरिबांकरिता शासनाकडून येणारे धान्य काळ्याबाजारात विकले जाते. पाचूबंदर येथील शासकीय गोदामातून धान्याची अफरातफर होत असल्याचे वृत्त आहे. शासकीय गोदाम व्यवस्थापक शशिकांत गवळी यांची सदर प्रकरणी चौकशी झाल्यास अफरातफरीचे खुलासे होतील.
शशिकांत गवळी हे मागील २ महिन्यांपासून रजेवर आहेत. या काळात या ठिकाणची जबाबदारी कोणाकडे आहे? गोदामातून जो माल बाहेर पाठविला जातो त्याची नीट नोंद ठेवली जात नाही. शशिकांत गवळी हे मागील अनेक वर्षांपासून या ठिकाणी काम करतात. सरकारी अधिकारी /कर्मचारी नियमानुसार ३ वर्षाहून अधिक काळ एका ठिकाणी राहू शकत नाही. असे असताना शशिकांत गवळी एवढी वर्षे याच गोदामात कर्तव्य बजावत आहेत.
पाचूबंदर शासकीय गोदामात होणारी धान्याची अफरातफर उघड करण्याकरिता या गोदामात सी सी टी व्ही कैमेरे बसवावेत.
शासकीय गोदामातील धान्याच्या अफरातफरीबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *