प्रतिनिधी : 

पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील नायगाव जूचंद्र येथील पाणजु क्षेत्रात बेकायदेशीरपणे  रेती उपसा केला जात असून वसईच्या  तहसीलदार उज्ज्वला भगत यांचे या अवैध रेती उत्खननाला संरक्षण लाभलेले आहे. सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनाने कारवाई करावी. पोलिसांना ही रेती माफियांकडून मालपाणी मिळत असल्यामुळे पोलीस कारवाई करीत नाहीत. सर्व पैशाचा खेळ चालू आहे. सर्व काही अंदाधुंद चालू आहे. 

मागील अनेक वर्षांपासून नायगाव येथील जूचंद्र पाणजु गावात असलेल्या  रेती बंदरातून बेकायदेशीरपणे रेती उत्खनन होत असून या बाबत तहसीलदार कार्यालयाकडे सातत्याने तक्रारी केल्या गेल्या आहेत. मात्र सदर रेती माफियाकडून महसूल विभाग अधिकारी, पोलिसांना हप्ता दिला जात असल्यामुळे कारवाई होत नाही.

एम. जी. जी. डोलारे एन्टरप्रायझेस या कंपनीकडून  रेतीचे बेकायदेशीरपणे उत्खनन होत असून सदर प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी. शासनाचे महसुली नुकसान होते  मात्र अधिकाऱ्यांना त्याचे काहीच सोयरसुतक नाही. अधिकाऱ्यांना तर असा भयंकर माज चढला आहे की, तक्रारींना न जुमानत नाहीत. हा माज उतरवणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रथम अधिकाऱ्यांचा माज उतरविण्याकरिता ठोस उपाययोजना करावी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *